शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मालमत्ता कर वसुलीसाठी ‘बार चार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:35 IST

मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. गेल्या वर्षात सर्वेक्षणातील घोळाचा वसुलीला फटका बसला. अर्ध्याहून अधिक डिमांडचे वाटप करण्यात आलेले नाही. याचा वसुलीवर परिणाम झाला. परंतु पुढील वर्षात मालमत्ता कर वसुलीसाठी ‘बार चार्ट’ तयार क रण्यात येणार आहे. ४०० कोटींची कर वसुली होईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देदर महिन्याला वसुलीचा आढावा : वर्षभरात ४०० कोटींची वसुली करण्याचा कुकरेजा यांचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. गेल्या वर्षात सर्वेक्षणातील घोळाचा वसुलीला फटका बसला. अर्ध्याहून अधिक डिमांडचे वाटप करण्यात आलेले नाही. याचा वसुलीवर परिणाम झाला. परंतु पुढील वर्षात मालमत्ता कर वसुलीसाठी ‘बार चार्ट’ तयार क रण्यात येणार आहे. ४०० कोटींची कर वसुली होईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली.मालमत्ता कर वसुलीसाठी गेल्या काही दिवसात बैठका आयोजित करण्यात आल्या. यात वर्षभरातील कर वसुलीवर चर्चा करण्यात आली. ५०० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य देण्यात आले आहे. सर्वेक्षण करून मालमत्ताधारकांना डिमांड वाटप केल्या तर ४०० कोटीची कर वसुली सहज शक्य आहे. मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. याची वसुली झाली तरी महापालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होईल. यासाठी नियोजनाची गरज आहे. कर वसुलीची जबाबदारी पार न पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुकरेजा यांनी दिली. मालमत्ता कर वसुलीचा नियमित आढावा घेण्यात यावा. यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत कर विभागाचा आढावा घेतला जाणार आहे.वैशालीनगर स्विमिंग पुलाची निविदावैशालीनगर येथील स्विमिंग पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नासुप्रने हा पूल महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे. याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सोपविण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.१५ मेपर्यंत अर्थसंकल्प सादर करणार्महापालिकेच्या २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू आहे. १५ मेपर्यंत अर्थसंकल्प सादर केला जाईल. स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी जे प्रस्ताव सादर करण्यात आले यासाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. त्यामुळे प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीकडे नोंदीसाठी ठेवण्यात येतील. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला जमीन देण्याबाबतचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर