शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत घुसलेला चोर पकडला

By admin | Updated: June 15, 2017 02:26 IST

बँक दरोडा किंवा मोठ्या घातपाताची तात्काळ सूचना देणाऱ्या ‘आॅटो डायलर सिस्टीम’मुळे एका बँकेत घुसलेला चोर रंगेहात पोलिसांच्या हाती लागला.

गाझियाबाद बँक दरोड्याची पुनरावृत्ती टळली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बँक दरोडा किंवा मोठ्या घातपाताची तात्काळ सूचना देणाऱ्या ‘आॅटो डायलर सिस्टीम’मुळे एका बँकेत घुसलेला चोर रंगेहात पोलिसांच्या हाती लागला. त्याबरोबरच उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील पंजाब नॅशनल बँकेतील मोठ्या दरोड्याची पुनरावृत्तीही टळली. बँकेत घुसून चोरीच्या प्रयत्नाची ही घटना बुधवारच्या पहाटे २.३० वाजताच्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रसेन चौकातील वडेभवनच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या युनायटेड बँक आॅफ इंडिया येथे घडली. सागर हरिहर मेंढे (२२), असे या चोराचे नाव असून तो तीन नल चौकनजीकच्या देवगरपुरा येथील रहिवासी आहे. तो अभियंता असल्याचे बोलले जाते. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता बँक बंद झाल्यानंतर सहायक व्यवस्थापक प्रज्ञा सुरेंद्रकुमार बोरकर रा. बँक कॉलनी जरीपटका यांनी स्वत: बँकेला कुलूप लावले होते. चाव्या घेऊन त्या आपल्या घरी गेल्या होत्या. बँकेच्या शटरची दोन्ही कुलपे आणि चॅनल गेटचे कुलूप तोडून चोर बँकेत घुसताच सायरन जोरजोराने वाजू लागले होते. चोर घुसल्याची किंवा घातपाताची सूचना देणारे ‘आॅटो डायलर सिस्टीम’ या बँकेत बसवण्यात आलेले आहे. बँकेत चोर घुसताच या सिस्टीमने बँकेचे वरिष्ठ प्रबंधक गोपाबंधू करण यांना त्यांच्या मोबाईलवर धोक्याची सूचना दिली. त्याचबरोबर पोलीस नियंत्रण कक्षालाही या बँकेत काही तरी मोठी घटना घडत असल्याची सूचना याच सिस्टीमद्वारे पोलीस नियंत्रण कक्षालाही मिळाली. गोपाबंधू करण हे बाहेरगावी असल्याने त्यांनी प्रज्ञा बोरकर यांना बँकेत सायरन वाजत असल्याची सूचना दिली. बोरकर यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांना सूचना दिली. त्या बँकेत येताच बँकेसमोर त्यांना प्रचंड पोलीस ताफा आणि लोकांची गर्दी दिसली. बँकेची सर्व कुलपे तुटलेली दिसली. पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांनी बँकेच्या आत जाऊन पाहिले असता सर्व लॉकर व्यवस्थित दिसले. पोलिसांनी बँक इमारतीची झडती घेतली असता त्यांना बँकेच्या समोरील जिन्याजवळील संडासमध्ये एक इसम लपलेला दिसला. लागलीच त्याला पकडण्यात आले. या चोराजवळ काळ्या रंगाची कॉलेज बॅग होती. बॅगेत लोखंडी आरी, एक हातोडा, सिगारेटचे पाकीट, लायटर, मोबाईल, नेव्ही ब्ल्यू रंगाचा रेनकोट, पांढऱ्या रंगाचा स्कार्फ आणि शर्ट होता. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यांना रेन कोट घातलेला, तोंडाला स्कार्फ बांधलेला आणि पाठीवर कॉलेज बॅग असलेला एक इसम दिसून आला. तो हा पकडलेला चोरच होता.या चोराला गणेशपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. १२ जून रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील पंजाब नॅशनल बँकेत चोरांनी घुसून ३० लॉकरमधील कोट्यवधी रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. युनायटेड बँक आॅफ इंडियामध्ये ‘आॅटो डायलर सिस्टीम’ नसती तर गाझियाबाद घटनेची पुनरावृत्ती घडली असती, असे बोलले जात आहे.