शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या नावावर बँकेला २.३१ कोटींचा गंडा

By admin | Updated: August 4, 2016 02:01 IST

दुसऱ्याची संपत्ती गहाण ठेवून बोगस दस्ताऐवजाच्या मदतीने सहकारी बँकेला २ कोटी ३१ लाखाचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नागपूर : दुसऱ्याची संपत्ती गहाण ठेवून बोगस दस्ताऐवजाच्या मदतीने सहकारी बँकेला २ कोटी ३१ लाखाचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळमना पोलिसांनी या प्रकरणी बँकेचे वकील आणि मूल्यांककासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणपत महादेव ढोके (आदर्श नगर), राजू माणिकराव चिंचखेड़े (श्रीशरण नगर, खामला), विकास रामकृष्ण भुते (म्हाळगी नगर), चंद्रप्रभा मनोहर सोनवणे (भोलेबाबा नगर, पिपला), मुकेश ध्रुव कुमार मेश्राम व हिमानी शालिकराम मेश्राम, सतीश प्रभुदास डोंगरे (भगवान नगर), दिवाकर मारुती मेश्राम व आशा दिवाकर मेश्राम (जवाहर नगर, भंडारा), राकेश प्रसाद उदयराज शाहु व सोनी राकेश प्रसाद शाहु (बेसा मार्ग), इर्गेश नत्थूजी मथलोन, (वाठोड़ा), समीर मनोहर वानखेडे व हेमराज राजू वानखेड़े (अंबा नगर, उमरेड मार्ग), मीना मधुकर वानखेड़े, मधुकर महादेव वानखेड़े (हावरापेठ), वकील ए.ए. काशीकर तथा मूल्यांकक मुंडले अशी आरोपींची नावे आहेत. कळमना पारडी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे. पोलीस सूत्रानुसार आरोपींनी या बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता. नियमानुसार बँकेने वकील आणि मूल्यांककाच्या माध्यमातून दस्ताऐवजांची तपासणी केली. आरोपींनी दुसऱ्यांची संपत्ती स्वत:च्या मालकीची असल्याचे सांगून ती संपत्ती बँकेत गहाण ठेवली. त्या संपत्तीचे बोगस दस्ताऐवज सुद्धा त्यांनी बँकेत सादर केले. २००८ पासून हा प्रकार सुरू होता. गेल्या मार्चमध्ये बँकेला याबाबत समजले. बँकेने प्रकरणाचा आपल्या स्तरावर चौकशी केली तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी बँकेतून २ कोटी ३१ लाख ४० हजार रुपयाची फसवणूक केली. काही आरोपी बँकेची किस्त सुद्धा वेळवर भरत नव्हते. बँक व्यवस्थापक हरीश जरगर यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फसवणुकीचे हे प्रकरण अतिशय मोठे असल्याने आर्थिक शाखेकडे त्याचा तपास सोपविण्यात आला आहे. यात काही आरोपी शासकीय कर्मचारी असल्याचेही सांगितले जात आहे. गुन्हा दाखल झाल्याने आरोपींमध्ये खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)