शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

कर्ज घेऊन बँकेला तीन कोटींचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 21:05 IST

बोगस दस्तावेजाच्या आधारावर एका मोबाईल व्यापाऱ्याने सात बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने बँक ऑफ बडोदाला तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देनागपुरातील मोबाईल व्यापाऱ्यासह सहा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बोगस दस्तावेजाच्या आधारावर एका मोबाईल व्यापाऱ्याने सात बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने बँक ऑफ बडोदाला तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईल व्यवसायिक संजय मोटूमल कुकरेजा (४४) रा. देव एनक्लेव कुशीनगर, महेश उदरनमल भटेजा (४१) रा. कुशीनगर, अजय गंगाधर सुटे (४१) धाडीवाल ले-आऊट, वामन हेडाऊ (६१) वाडी, ध्रितेश सुनील मन्ना (३२) रा. सिडको औरंगाबाद, रमेश चंद्रभान लांबाहाते (५३) अयोध्यानगर, राजेश महावीरप्रसाद खरे (६३) रा. अभ्यंकरनगर आणि विजय रामचंद्र पेटकर (५४) रा. दयालू सोसायटी जरीपटका अशी आरोपींची नावे आहे.संजय मोटुमल कुकरेजा याचे सीताबर्डी येथे मोबाईल शॉपी आहे. कुकरेजाला व्यापारासाठी कर्जाची गरज होती. कामठी रोडवर त्याची जमीन आहे. कृषी जमीन असल्यामुळे कुकरेजा यांना बँकेतून मोठे कर्ज मिळू शकत नव्हते. त्यामुळे कुकरेजाने ही जमीन अकृष (एनए) असल्याचे बोगस दस्तावेज तयार केले. या दस्तावेजाच्या आधारावर २०१३ मध्ये बँक ऑफ बडोदाच्या अनंतनगर शाखेत कर्जासाठी अर्ज सादर केला. कुकरेजाचे बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत होते. त्यामुळे त्यांनी एनएची तपासणी केली नाही. कर्जाच्या दस्तावेजावर गँरेंटर म्हणून महेश भटेजाने स्वाक्षरी केली. बँकेच्या अधिकाऱ्याने दस्तावेजाची कुठलीही चौकशी न करता कर्ज मंजूर केले. कुकरेजाने काही महिने कर्जाची बरोबर किस्त भरली. परंतु नंतर मात्र किस्त भरणे बंद केले. अनेक महिने किस्त न भरल्यावर बँकेने किस्त भरण्याची नोटीस बजावली. परंतु त्यानंतरही कुकरेजाने कुठलेही पाऊल न उचलल्यामुळे बँकेने कुकुरेजाच्या दस्तावेजांची चौकशी केली. तेव्हा एनए प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले. कुकरेजाला कर्ज मंजूर करणाऱ्या बहुतांश बँक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. बँकेचे सध्याचे शाखा व्यवस्थापक राजू अमरू यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. तपासानंतर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात कुकरेजा व इतर लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी