शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे सव्वा कोटीचे कर्ज उचलून बँकेला गंडा घालणाऱ्या एका चौकडीविरुद्ध सदर पोलिसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे सव्वा कोटीचे कर्ज उचलून बँकेला गंडा घालणाऱ्या एका चौकडीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वीच ही बनवाबनवी बँकेच्या लक्षात आल्यानंतरही तक्रार नोंदवण्यास का उशीर झाला, ते स्पष्ट न झाल्यामुळे आश्चर्यवजा संशय व्यक्त केला जात आहे.

प्रमोद मोतीराम वालमांढरे, शीतल प्रमोद वालमांढरे (रा. बालाजीनगर), कृष्णकुमार लक्ष्मणराव देशमुख (रा. शंकरनगर) आणि रोशन होरे (रा. प्रतापनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी प्रमोद वालमांढरे आणि त्यांची पत्नी शीतल या दोघांनी २०१३ मध्ये तत्कालीन काॅर्पोरेशन बँक आणि सध्याच्या युनियन बँक ऑफ इंडिया किंग्स वे शाखेमध्ये गृह कर्ज मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे आणि निर्मलबाई जोशी यांच्या मालमत्तेची कागदपत्रे सादर केली होती. कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर बँकेने २४ नोव्हेंबर २०१३ ला आरोपी प्रमोद आणि शीतल वालमांढरे या दोघांना एक कोटी २० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. घराचे विक्रीपत्र झाल्यानंतर गृहकर्जाचा डिमांड ड्राफ्ट मूळ भूखंड मालक आरोपी देशमुख यांच्या नावाने तयार करून देण्यात येईल, असे ठरले होते. त्यानुसार शीतल प्रमोद आणि देशमुख या तिघांनी संबंधित घराचे विक्रीपत्र बँकेत जमा केले. त्यानंतर बँकेने एक कोटी ९ लाख रुपये (डीडी) आरोपी देशमुख याच्या खात्यात जमा केले. तर ११ लाखाची रक्कम घर दुरुस्तीच्या नावाखाली वालमांढरे दाम्पत्‍याला दिली. घर दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या रकमेपैकी पाच लाख रुपये वालमांढरे दाम्पत्याने आरोपी देशमुखच्या खात्यात हस्तांतरित केले. दरम्यान, आरोपींना कर्जाची परतफेड दरमहा एक लाख २० हजार रुपये अशा स्वरूपात परत करायची होती. ठरल्याप्रमाणे ३ जुलै २०१५ पर्यंत आरोपींनी नियमित हप्ते भरले. नंतर मात्र रक्कम भरणे बंद केल्यामुळे ३१ जुलै २०१५ बँकेने आरोपींना नोटीस पाठविली. प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँक व्यवस्थापक आणि कर्मचारी प्रमोद वालमांढरे यांच्या घरी गेले. त्यावेळी बनवाबनवी उघड झाली. ज्या घराचे आरोपींनी विक्रीपत्र करून कर्ज उचलले होते, ते घर निर्मलाबाई जोशी यांचे असून त्यांनी १९८८ मध्ये नोंदणीकृत मृत्युपत्र तयार करून प्रदीप भुसारी नामक नातेवाईकाच्या नावे केले होते. तेथे आरोपी रोशन होरे हा भाड्याने राहत होता. २६ जुलै १९९५ ला निर्मलाबाई मृत झाल्यानंतर आरोपी होरे याने बनावट कागदपत्र तयार केले आणि ती मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेतली. त्यामुळे प्रदीप भुसारी यांनी या मालमत्तेच्या ताब्यासाठी न्यायालयात धाव घेतली. आरोपी होरेविरुद्ध गुन्हाही दाखल केला. ही पार्श्वभूमी असताना आरोपी वालमांढरे दाम्पत्य, देशमुख तसेच होरे या चौघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत कर्ज प्रकरण सादर करून एक कोटी वीस लाख रुपयांची उचल केली आणि ती रक्कम स्वतः वाटून घेतली.

----

विलंब का?

विशेष म्हणजे १९९५ ला ही बनवाबनवी उघड झाली असताना बँकेने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास पाच वर्षे का लावली, ते कळायला मार्ग नाही. सदर पोलिसांनी बँक व्यवस्थापक राजेश पांडुरंग गावंडे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. उपरोक्त आरोपींची चौकशी केली जात आहे.

-----