शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचारी स्वत:च खराब करतात नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 10:32 IST

बँक कर्मचाऱ्यांनी नोटांची काळजी घ्यायला पाहिजे. परंतु, ते स्वत:च नोटा खराब करीत आहेत. बऱ्याच बँक कर्मचाऱ्यांना नोटांवर लिहिण्याची सवय आहे.

ठळक मुद्देनोटांवर लिहिण्याची सवयडिपॉझिट मशीन स्वीकारत नाहीत अशा नोटा

फहीम खान।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँक कर्मचाऱ्यांनी नोटांची काळजी घ्यायला पाहिजे. परंतु, ते स्वत:च नोटा खराब करीत आहेत. बऱ्याच बँक कर्मचाऱ्यांना नोटांवर लिहिण्याची सवय आहे. अशा नोटा डिपॉझिट मशीनद्वारे स्वीकारल्या जात नाही. त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे.वर्तमान परिस्थितीत बहुतेक बँकांनी ग्राहकांच्या सुविधेसाठी डिपॉझिट मशीन लावल्या आहेत. त्या मशीनद्वारे ग्राहक स्वत:च हव्या त्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करू शकतो. त्यामुळे बँकांमधील गर्दी कमी झाली आहे. ग्राहकांचा रांगेत उभे राहण्याचा त्रासही संपला आहे. परंतु, डिपॉझिट मशीन काही नोटा स्वीकारत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या नोटांमध्ये पेनाने काही तरी लिहिलेल्या व अन्य खराब नोटांचा समावेश आहे.

नोटा तपासून घ्याबँक व एटीएममधून मिळालेल्या नोटा चांगल्या पद्धतीने तपासून घ्या. एटीएममधून बरेचदा पेनाने काही तरी लिहिलेल्या, फाटलेल्या व मळकट नोटा मिळतात. अशा नोटा डिपॉझिट मशीन स्वीकारत नाही. सहज शक्य असल्यास नोटांवर लिहिलेले मिटविण्याचा प्रयत्न करा.

नोटांवर का लिहितात कर्मचारीचौकशीनंतर मिळालेल्या माहितीनुसार, बँक कर्मचारी १०० नोटांचे गठ्ठे तयार करतात. त्यामुळे ते वरच्या नोटेवर एकूण आकडा लिहून ठेवतात. गरज संपल्यानंतर कर्मचाऱ्यांनी नोटांवर लिहिलेले मिटविले पाहिजे, असा नियम आहे. परंतु, कर्मचारी काही कारणांमुळे असे करीत नाहीत. त्याचे नुकसान ग्राहकांना सहन करावे लागते.

व्यापाऱ्यांनाही लिहिण्याची सवयव्यापाऱ्यांनाही नोटांवर लिहिण्याची सवय असते. व्यापारी अशा नोटा बँकेत जमा करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना समज दिली जाते. परंतु, परिस्थितीत फारसा बदल घडलेला नाही.

ग्राहक वारंवार प्रयत्न करतात१०-१२ हजार रुपये जमा करायचे असल्यास बहुतेक नोटा मशीनद्वारे स्वीकारल्या जात नाहीत. त्यानंतर त्या नोटा परत परत मशीनमध्ये टाकाव्या लागतात. वारंवार प्रयत्न केल्यानंतर काही नोटा स्वीकारल्या जातात. परंतु, जास्तीतजास्त नोटा परत मिळतात. यात ग्राहकांचा वेळ वाया जातो.

टॅग्स :bankबँक