शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

एटीएममुळे बँक खातेदारांना मनस्ताप

By admin | Updated: November 24, 2014 01:16 IST

स्थानिक युनियन बँकेच्या एटीएम मशीनमध्ये नेहमीच पुरेशी रक्कम ठेवल्या जात नाही. कधी रक्कम असते तर ५०० व १००० रुपयांच्या नोटा उपलब्ध नसतात. त्यामुळे स्थानिक युनियन बँकेच्या

रामटेक : स्थानिक युनियन बँकेच्या एटीएम मशीनमध्ये नेहमीच पुरेशी रक्कम ठेवल्या जात नाही. कधी रक्कम असते तर ५०० व १००० रुपयांच्या नोटा उपलब्ध नसतात. त्यामुळे स्थानिक युनियन बँकेच्या एटीएम कार्डधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक व्यवहार गोत्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व खासगी शाळांतील शिक्षकांचे पगार युनियन बँकेच्या विविध शाखांमधून केले जातात. युनियन बँकेच्या बहुतांश खातेदारांकडे एटीएम कार्ड आहे. बहुतांश कर्मचारी त्यांच्या पगाराची संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढत नाही. ही मंडळी त्यांच्या सोईनुसार बँकेतून रक्कम काढत असते. यासाठी शिक्षक मंडळी एटीएम कार्ड व मशीनचा उपयोग करते. कारण एटीएम मशीनमधून कधीही रक्कम काढता येते. यात खातेदारांच्या वेळेची बचत होऊन त्यांचा त्रास वाचतो.युनियन बँकेच्या खातेदारांना याच बँकेच्या एटीएममधून महिन्याला आठवेळा आणि इतर बँकेच्या एटीएममधून तीनवेळा पैसे काढता येतील, अशी सूचना बँकेने एसएमएसद्वारे खातेदारांना दिली. याव्यतिरिक्त युनियन बँकेच्या एटीएमचा अधिक वापर केल्यास प्रत्येक व्यवहाराला १५ रुपये व इतर बँकेच्या एटीएमचा वापर केल्यास प्रत्येक व्यवहारासाठी ५० रुपये बँक खात्यातून कपात केले जाईल, असेही कळविण्यात आले.रामटेक शहरात रामटेक-तुमसर मार्गावर युनियन बँकेची एकमेव एटीएम मशीन आहे. या मशीनमध्ये कधीच पुरेशी रक्कम नसते. यात केवळ १०० रुपयांच्या नोटांचा भरणा अधिक असतो. एखाद्या व्यक्तीला ५० हजार रुपये हवे असल्यास त्याला प्रत्येकी तीन हजार रुपयांप्रमाणे किमान १६ वेळा विड्रॉल घ्यावे लागतील. यातून त्याच्या बँक खात्यातून १२० रुपयांची महिन्याकाठी कपात केली जाईल. हा प्रकार वारंवार होत असल्याने खातेदारांनी बँक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर बँक शाखा व्यवस्थापक अधिकारी असंबद्ध उत्तरे देत असल्याचा आरोप खातेदारांनी केला. या प्रकाराला वेळीच आळा घालावा, तसेच शिक्षकांशी सलोख्याने वागावे, अशी मागणी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)