लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : महिलेने निनावी फाेन काॅलवर विश्वास ठेवत गाेपनीय माहिती दिली असता, तिच्या बँक खात्यातून रकमेची परस्पर उचल करण्यात आली. नंतर ती रक्कम परत तिच्या खात्यात जमा केली. तिने बँक शाखेत जाऊन चाैकशी केली असता, ॲपचा वापर करून तिच्या पतीच्या नावे कर्ज घेत त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने २ लाख ४८ हजार ४०० रुपयांची उचल करण्यात आली. बँक खातेदाराची फसवणूक केल्याचा हा प्रकार माैदा शहरात नुकताच घडला.
विना रामकिशन वैद्य (४३, रा. स्नेहनगर, माैदा) यांना निनावी फाेन काॅल आला. आपण एसबीआयच्या मुख्य शाखेतून वर्मा बाेलत असल्याची त्या व्यक्तीने बतावणी केली. शिवाय, बँक अकाऊंट व्हेरिफिकेश सुरू असल्याने ओटीपी सांगण्याची सूचना केली. विना यांनी ओटीपी सांगताच त्याने विना यांच्या बँक खात्यातून १९,९९८ रुपयांची उचल केली. हा प्रकार विना यांच्या मुलीला कळताच तिने परत त्याच क्रमांकावर फाेन करून तुम्ही उचल केलेली रक्कम खात्यात जमा करण्याची सूचना केली. त्यामुळे त्या व्यक्तीने विना यांच्या खात्यात १९,९९८ रुपये जमा केले.
संशय आल्याने विना यांनी बँक शाखेत जाऊन अधिकाऱ्यांकडे चाैकशी केली व त्यांच्या पतीच्या खात्याचे विवरण घेतले. अनाेळखी व्यक्तीने याेना ॲपचा वापर करीत कर्ज घेतले आणि त्यांच्या पतीच्या पेन्शन अकाऊंटमधून टप्प्याटप्प्याने २ लाख ४८ हजार ४०० रुपयांची परस्पर उचल करण्यात आल्याचे त्यांना अधिकाऱ्यांकरवी सांगण्यात आले. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा सहकलम ६६ डी अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपीचा शाेध सुरू केला आहे. या घटनेचा तपास पाेलीस हवालदार कुथे करीत आहेत.