शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरील जाहिरातींवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:06 IST

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघात समाजमाध्यमा (सोशल मीडिया)वरील उमेदवारांच्या प्रचार व प्रसारावर बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचे निर्देशलोकप्रतिनिधी कायदा कलम १२६ (१) (बी)नुसार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघात समाजमाध्यमा (सोशल मीडिया)वरील उमेदवारांच्या प्रचार व प्रसारावर बंदी घालण्यात आली आहे.गुरुवारी ११ एप्रिल २०१९ रोजी नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मतदान दिवसाच्या ४८ तासापूर्वीच उमेदवारांच्या सर्वप्रकारच्या प्रचार व प्रसारावर निवडणूक आयोगाकडून बंदी घालण्यात आली आहे. समाजमाध्यमा(सोशल मीडिया)वर उमेदवार किंवा पक्षाचा प्रचार-प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारचा प्रचार व प्रसार आढळून आल्यास लोकप्रतिनिधी कायदा कलम १२६ (१) (बी)नुसार संबंधित राजकीय पक्ष, त्यांचे समर्थक व अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांनी कळविले आहे.‘सोशल मीडिया’वर प्रचार सुरूच : प्रशासनाचे नियंत्रण नाहीचनिवडणुकांचा प्रचार मंगळवारीच बंद झाल्याने मतदानाच्या पूर्वसंध्येला उमेदवारांच्या कार्यालयातदेखील प्रचाराच्या दृष्टीने शांतता दिसून येत होती. मात्र ‘सोशल मीडिया’वर मात्र प्रचार सुरूच असल्याचे चित्र होते. उमेदवारांना मत देण्याचे आवाहन समर्थकांकडून करण्यात येत असून ‘व्हॉट्सअ‍ॅप’सारख्या ‘अ‍ॅप’ची तपासणी शक्य नसल्याने प्रशासनाचा इशारा बिनकामाचा ठरला.प्रत्यक्ष प्रचार बंद झाला असला तरी ‘सोशल मीडिया’वरील विविध ‘प्लॅटफॉर्म्स’वर ‘पोस्ट’ फिरविण्यात येत आहेत. ‘फेसबुक’, ‘टिष्ट्वटर’वर हे प्रमाण कमी असले तरी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर अनेकांकडून प्रचाराशी संबंधित ‘कन्टेंट’ टाकण्यात येत आहे. उमेदवारांच्या क्रमांक किंवा अकाऊंटवरुन हे प्रकार सुरू नसले तरी त्यांच्या समर्थकांकडून ‘ई प्रचार’ जोरदार सुरू आहे. यात संबंधित पक्ष, उमेदवाराच मत द्या असे आवाहन करण्यात येत आहे.निवडणूक आयोगाने ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. मात्र ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील संदेशांची चाचपणी करणे ही कठीण बाब आहे. शिवाय उमेदवारांचे कार्यकर्ते, प्रचार यंत्रणा लक्षात घेता प्रत्येकाच्या फोनमधील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची तपासणी करणे शक्यच नाही. ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर नेमक्या कुठल्या संदेशांची देवाणघेवाण होत आहे, यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा आयोगाकडे नाही. त्याचाच फायदा उचलून प्रचाराची मुदत संपल्यानंतरदेखील ‘ऑनलाईन’ प्रचार सुरूच आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019