शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाल्या बिनेकर हत्या प्रकरण : आणखी दोन आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:00 IST

बाल्या बिनेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली. आदर्श ऊर्फ पप्पू अनिल खरे आणि रवी ऊर्फ चिंटू सुरेश नागाचारी अशी या आरोपींची नावे असून त्यांनी या हत्याकांडात पडद्यामागून महत्त्वाची भूमिका वठवल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाल्या बिनेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली. आदर्श ऊर्फ पप्पू अनिल खरे आणि रवी ऊर्फ चिंटू सुरेश नागाचारी अशी या आरोपींची नावे असून त्यांनी या हत्याकांडात पडद्यामागून महत्त्वाची भूमिका वठवल्याचे स्पष्ट झाले आहे.शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास बोले पेट्रोल पंप चौकात कुख्यात गुन्हेगार चेतन सुनील हजारे, रजत राजा तांबे, भारत राजेंद्र पंडित, आसीम विजय लुडेरकर आणि त्याच्या अनिकेत नामक साथीदाराने बाल्या बिनेकरची भीषण हत्या केली. अनिकेत फरार असून उपरोक्त चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या कस्टडीत आहेत. गेल्या ४८ तासाच्या चौकशीत आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालविले होते. चारही आरोपी वेगवेगळी आणि विसंगत माहिती देत असल्यामुळे पोलिसांनी चौघांनाही क्रॉस चेक केले. त्यानंतर आरोपी बोलू लागले. या हत्याकांडाचे कट-कारस्थान अनेक दिवसांपूर्वीच रचण्यात आले. त्यानुसार आरोपींनी ऑनलाईन शस्त्र खरेदी केली. आरोपी पप्पू याने शस्त्राचे पैसे चुकविले तर हत्येपूर्वी आणि हत्येनंतर चिंटू नागाचारी याने आरोपींना मदत केल्याचे उघड झाले.आरोपीची क्रूरताअटकेतील आरोपी रजत तांबे याने यापूर्वी दिवसाढवळ्या सीताबर्डीच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील भरत खटवणी नामक व्यापाऱ्याची २०१५ मध्ये हत्या केली होती. त्यावेळी अल्पवयीन असल्याने त्याला पाहिजे तसा धडा पोलिसांकडून शिकवला गेला नाही. त्यामुळे तो जास्तच निर्ढावला. आता हा गुन्हा करून त्याने क्रूरतेलाही लाजविले. बाल्याची हत्या केल्यानंतर हजारे, लुडेरकर आणि अनिकेत दुसरीकडे पळून गेले. तर पंडितच्या बुलेटवर बसून जाताना काही वेळानंतर तांबे पुन्हा बाल्याच्या मृतदेहाजवळ आला आणि त्याच्या शरीरावर गुप्तीचे घाव घातले. गुप्ती त्याच्या शरीरात फसल्यामुळे आरोपी तांबेने मृतदेहावर पाय ठेवून ती खेचून बाहेर काढली. यावरून त्याच्या क्रूरतेची कल्पना यावी.दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पप्पू खरे आणि चिंटूला पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांचा ५ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला. दरम्यान, या प्रकरणात आणखी अनेक जणांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे गुन्हे शाखेसह शहर पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांनी संशयितांकडे नजर रोखली आहे. नागपुरातील कुख्यात जुगार अड्डा चालकासह अनेकांची चौकशीही पोलिसांनी केलेली आहे.लोकमतचे वृत्त खरे ठरलेलोकमतने हत्याकांडात पडद्यामागे सूत्रधार दडून असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या घडामोडींमुळे लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे लवकरच होणार आहेत.

टॅग्स :MurderखूनArrestअटक