शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाल्या बिनेकर हत्याकांड : आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:14 IST

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नागपुरातील बाल्या बिनेकर हत्याकांडातील आरोपींना पोलिसांनी सोमवारी दुपारी अत्यंत कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. पोलिसांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

ठळक मुद्देकडेकोट बंदोबस्तात न्यायालयात केले हजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नागपुरातील बाल्या बिनेकर हत्याकांडातील आरोपींना पोलिसांनी सोमवारी दुपारी अत्यंत कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. पोलिसांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या बोले पेट्रोल पंपाजवळ आरोपी चेतन सुनील हजारे, रजत राजा तांबे, भारत राजेंद्र पंडित आणि आसीम विजय लुडेरकर तसेच त्यांच्या एका साथीदारानेबाल्या ऊर्फ किशोर एकनाथ बिनेकर याची भीषण हत्या केली होती. या गुन्ह्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली असून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्ह्याचा मुख्य आरोपी चेतन सुनील हजारे (३०, रा. बारा सिग्नल, बोरकर नगर, इमामवाडा) तसेच रजत तांबे, आसीम लुडेरकर आणि भारत पंडित या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांना रविवारी रात्री सीताबर्डी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. सीताबर्डी पोलिसांनी आज दुपारी २ च्या सुमारास आरोपींना अत्यंत कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. गुन्ह्याच्या संबंधाने आरोपींकडून त्यांचे साथीदार आणि शस्त्रांसंबंधी माहिती घ्यायची आहे, असे सांगून पोलिसांनी पीसीआरची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी ग्राह्य धरत आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कस्टडी मंजूर केली.न्यायालय परिसरात कडक बंदोबस्तआरोपींनी केलेल्या गुन्ह्याची व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे लोकभावना संतप्त आहेत. रविवारी बाल्याच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या भावना संतप्त होत्या. ते लक्षात घेत कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस उपायुक्त विनिता शाहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने हे स्वत: न्यायालय परिसरातील बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. रस्त्यावरही गुन्हे शाखेतील पोलिस साध्या वेशात मोठ्या संख्येत हालचाली टिपत होते.

टॅग्स :MurderखूनArrestअटकCourtन्यायालय