शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
3
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
4
'अमेरिका स्वतः रशियन तेल खरेदीची परवानगी देते; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
5
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
6
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
7
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
8
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
9
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
10
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
11
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
12
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
13
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
14
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
15
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
16
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
17
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
18
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
19
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
20
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?

रामबाग येथील खुनातील आरोपीचा जामीन फेटाळला

By admin | Updated: June 29, 2016 02:54 IST

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग येथील राजू गजभिये यांच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या ...

न्यायालय : मुलाचे भांडण वडिलांच्या जीवावर बेतलेनागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग येथील राजू गजभिये यांच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. राजू ऊर्फ सल्ली पुनाजी पेंदाम (३७) असे आरोपीचे नाव असून, तो जुना बाभूळखेडा येथील रहिवासी आहे. राजू गजभिये यांच्या खुनाची घटना ११ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली होती. प्रकरण असे की, या घटनेच्यापूर्वी राजू गजभिये यांचा मुलगा बादल (२५) हा मोटरसायकलने आपल्या कौशल्यानगर येथील सासऱ्याला भेटण्यास गेला होता. परततेवेळी त्याच्या मोटरसायकलचा धक्का एका मुलीला लागला होता. त्यामुळे बादल याची कौशल्यानगर येथील काही मुलांसोबत बाचाबाची झाली होती. आपसात वाद निपटून बादल हा आपल्या रामबाग येथील घरी परत आला होता. त्याच रात्री आरोपी संजय आत्माराम अलोणे, मनोज अलोणे, मनोज सहारे, आकाश राजन मोरे, रोहित धनराज सोनारकर, राजू पेंदाम, गौतम देवीदास राऊत, अश्वजित प्रदीप तागडे, मुकेश उईके आदींनी घातक शस्त्रानिशी बादल गजभिये याच्या घरावर चालून आले होते. एवढे लोक आपल्या घराजवळ कसे काय आले हे पाहण्यासाठी बादलचे वडील राजू गजभिये हे घराबाहेर आले असता हल्लेखोरांनी त्यांच्यावरच सशस्त्र हल्ला करून त्यांचा निर्घृणपणे खून केला होता. वडिलांच्या बचावासाठी धावलेल्या बादलवरही हल्लेखोरांनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. इमामवाडा पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९, भारतीय शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करून मुकेश उईकेव्यतिरिक्त सर्व आरोपींना अटक केली होती. मुकेश हा अद्याप फरार आहे. सर्व आरोपींविरुद्ध २० नोव्हेंबर २०१५ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ८ जानेवारी २०१६ रोजी हे प्रकरण सत्र न्यायालयात दाखल झाले आहे. राजू ऊर्फ सल्ली पेंदाम याने जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने तो फेटाळून लावला. निरपराध राजू गजभिये यांच्या खुनाच्या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये गँगवारचे स्वरूप निर्माण झाले आहे. इमामवाडा, धंतोली आणि अजनी भागात हे गट एकमेकांना धमक्या देत आहेत. त्यांच्यात हाणामाऱ्या होत आहेत. वडिलांच्या खुनाचा सूड म्हणून बादल आणि साथीदारांनी सौरभ संजय अलोणे याच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे. याप्रकरणी धंतोलीत भादंविच्या ३०७, ३९७, १४७, १४८, १४९. ३४१ कलमान्वये बादल गजभिये आणि साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल असून ११ जण अटकेत आहेत. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. शकील यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी.एस. वैद्य हे आहेत. (प्रतिनिधी)