शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

आंबेकरला जामीन

By admin | Updated: July 5, 2014 02:10 IST

न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. परवाणी यांच्या न्यायालयाने नागपुरी डॉन संतोष आंबेकर याला जामीन मंजूर केला.

नागपूर : न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. परवाणी यांच्या न्यायालयाने नागपुरी डॉन संतोष आंबेकर याला जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशानुसार आंबेकर हा कारागृहाच्या बाहेर पडताच त्याला १ जुलै रोजी आर्थिक गुन्हे पथकाने अटक करून त्याचा चार दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. मूळ प्रकरण असे की, संतोष आंबेकरचा भाचा शैलेश ज्ञानेश्वर केदार, खुद्द आंबेकर आणि साथीदारांनी एका बलात्कारपीडित तरुणीचे वेडसरपणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि शपथपत्र तयार केले होते. या दस्तऐवजांचा आधार घेऊन शैलेश हा सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेण्याच्या प्रयत्नात असताना, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. परिणामी १० फेब्रुवारी २०१४ रोजी सदर पोलीस ठाण्यात शैलेश आणि साथीदारांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आंबेकरच्या पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपताच आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर करून, त्याच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली. बचाव पक्षाने पोलीस कोठडी रिमांडचा विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. लागलीच बचाव पक्षाने जामीन अर्ज दाखल करताच न्यायालयाने तो मंजूर करून आरोपीला सात हजाराच्या अनामत रकमेवर सोडण्याचा आदेश दिला. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. डी. एस. श्रीमाळी, अ‍ॅड. राम मासुरके यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)