शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बॅग विक्रेत्याने लावला शाळेच्या आवारात गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST

नागपूर - सीताबर्डीतील एका बॅग विक्रेत्याने भिडे कन्या शाळेच्या आवारात गळफास लावून आत्महत्या केली. अभिजित कोहळे (वय ३०) असे ...

नागपूर - सीताबर्डीतील एका बॅग विक्रेत्याने भिडे कन्या शाळेच्या आवारात गळफास लावून आत्महत्या केली. अभिजित कोहळे (वय ३०) असे त्याचे नाव आहे. सोमवारी रात्री ही घटना उघड झाल्यापासून उलटसुलट तर्कवितर्क लावले जात आहेत.

सीताबर्डीच्या मोदी नंबर ३ मध्ये भिडे कन्या शाळा आहे. शाळेची इमारत जुनी झाल्याने ती बंद अवस्थेत आहे. शाळेच्या आवारातील एका खोलीत कोहळे राहत होता. तो तेथून बॅग विक्री करायचा. बाजूच्या खाली जागेत पार्किंगही चालवायचा. सोमवारी रात्री १०.५० च्या सुमारास तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. ही माहिती कळताच ठाणेदार अतुल सबनीस, पीएसआय प्रवीण सुरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. कोहळेने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, ते स्पष्ट झाले नाही. त्याने कोणती सुसाईड नोटही लिहून ठेवली नसल्याचे पोलीस सांगतात. दरम्यान, कोहळेच्या आत्महत्येमुळे उलटसुलट तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रीती अभिजित कोहळे (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

गळफास लावून आत्महत्या

नागपूर - गिट्टीखदानमधील योगेंद्रनगर झोपडपट्टीत राहणारे प्रवीण मधुकरराव भांदककर (वय ३६) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास प्रवीण गळफास लावून दिसल्यानंतर घरच्यांनी त्यांना रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मधुकर कृष्णाजी भांदककर (वय ७८) यांनी दिलेल्या माहितीवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---