शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांचा निधी त्यांच्यासाठीच खर्च व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:44 IST

अनुसूचित जाती व आदिवासींच्या कल्याणासाठी असलेला निधी शेतकरी कर्जमाफीसाठी न वळविता त्यांच्या कल्याणासाठीच खर्च करावा, .....

ठळक मुद्देप्रकाश गजभिये यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुसूचित जाती व आदिवासींच्या कल्याणासाठी असलेला निधी शेतकरी कर्जमाफीसाठी न वळविता त्यांच्या कल्याणासाठीच खर्च करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. यासंदर्भात आ. गजभिये यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.अनुसूचित जाती व आदिवासींच्या कल्याणासाठी असलेला अनुक्रमे अनुसूचित जातीसाठी १३ टक्के तर अनुसूचित जमातीसाठी असलेला ७ टक्के हक्काचा संविधानिक निधी फक्त त्यांच्या कल्याणासाठीच खर्च करण्याची कबुली मागील पावसाळी अधिवेशनात दिल्यानंतरही हा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वळविण्यात आला.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आदिवासांच्या विकासासाठी १०० टक्के विकास निधी उपलब्ध असतानाही सन २०१४ ते २०१५ तर २०१५ ते २०१६ आणि २०१६ ते २०१७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती -जमातीच्या विकासासाठी प्रत्यक्षात फक्त ३१ टक्केच निधी खर्च करण्यात आलेला आहे. जवळपास १५ ते २० हजार कोटी निधी हा खर्चच करण्यात आलेला नाही, हा मागासवर्गीयावर फार मोठा अन्याय आहे.म्हणून अनुसूचित जाती व जमाती यांच्या कल्याणार्थ बजेट मधील तरतुदीनुसार असणारा निधी फक्त त्याच प्रवर्गासाठी खर्च करावा, अन्यत्र वळविल्यास अधिकाºयांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असा कठोर कायदा ओडिशा, आंध्रप्रदेश, कर्नाटकच्या धर्तीवर राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.