शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात १.६३ लाख हेक्टर सिंचनाचा अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 22:41 IST

जून २०१९ अखेरपर्यंत पश्चिम विदर्भात १ लाख ६३ हजार १३९ हेक्टर इतका सिंचनाचा अनुशेष कायम आहे. यावर जवळपास १५,४८८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, अशी माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे१५,४८८ कोटीची गरज : २०२२-२३ पर्यंत अनुशेष संपवण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पश्चिम विदर्भातील (अमरावती विभाग) आर्थिक अनुशेष २०११ मध्ये संपुष्टात आला असला तरी भौतिक अनुशेष अजूनही संपलेला नाही. जून २०१९ अखेरपर्यंत पश्चिम विदर्भात १ लाख ६३ हजार १३९ हेक्टर इतका सिंचनाचा अनुशेष कायम आहे. यावर जवळपास १५,४८८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, अशी माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली.आ. संचेती यांनी सांगितले, अमरावती विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी डिसेंबर २०१९ पर्यंत अनुशेष निर्मूलन कार्यक्रमांतर्गत १५,१७६.६५ कोटी खर्च झाले. यातील १४,४०१.०५ कोटी मार्च २०१९ पर्यंत झालेले असून २०१९-२० या वर्षामध्ये डिसेंबर २०१९ अखेर सुमारे ७७५.८० कोटी रुपये खर्च झालेले आहे. सध्या असलेला अनुशेष दूर करण्यासाठी आणखी १५,४८८ कोटीची आवश्यकता आहे. यापैकी जिगाव प्रकल्पाचीच नवी सुधारित प्रशासकीय मान्यता १३ हजार कोटीची आहे. यासोबतच बळीराजा जलसंजीवनी व प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेमधून केंद्रीय अर्थसाहाय्य व नाबार्ड कर्जाद्वारे अतिरिक्त निधी उभारण्यात येत आहे. अनुशेष निर्मूलन कार्यक्रमांतर्गत समाविष्ट प्रकल्पांपैकी २ मोठे प्रकल्प पंतप्रधान कृषी संजीवनी योजना अंतर्गत व ४१ प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. अनुशेषांतर्गतच्या एकूण १०२ प्रकल्पांपैकी ८१ प्रकल्पांना सुप्रमा मिळाल्या आहेत. २ प्रकल्पात सुप्रमा प्रतीक्षेत आहे. ३ प्रकल्पांचे प्रस्ताव त्रिसदस्यीय समितीकडून मंजूर झाले आहेत. १५ प्रकल्पांमध्ये वन विभागाची मान्यता असून १२ प्रकल्पांना अंतिम मान्यता मिळाली आहे. ३ प्रकल्प शिल्लक आहेत. एकूणच अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असून २०२२-२३ मध्ये हा अनुशेष दूर होईल, असा विश्वास असल्याचे आ. संचेती यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विदर्भ विकास मंडळाचे सदस्य सचिव हेमंत पवार उपस्थित होते.अनुशेष दूर करण्यासाठी वर्षनिहाय उपलब्ध निधी व झालेला खर्चवर्ष                  उपलब्ध निधी (कोटीत)       खर्च (कोटीत)मार्च २०१३          २०८०                                  ८६१मार्च २०१४          २१०८                                  ८८२मार्च २०१५          १२२१                                  १००४मार्च २०१६          २२४०                                 २०५५मार्च २०१७          १६७७                                १६९५मार्च २०१८           १९४८                               १४५३मार्च २०१९           १२६७                              १४७७मार्च २०२०          १२७५                               ७७६ (डिसेंबर अखेर)

टॅग्स :Vidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळMediaमाध्यमे