शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांचा शासकीय सेवेतील अनुशेष गेला अडीच लाखांवर

By admin | Updated: July 31, 2014 01:00 IST

शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यात मागासवर्गीयांचा नोकरीतील अनुशेष सतत वाढतो आहे. सरळ सेवा भरतीचा अनुशेष २ लाख ३४ हजार तर पदोन्नतीचा ७३ हजार इतका आहे. महाविद्यालये, विद्यापीठ, सहकारी संस्था

पदोन्नतीतही अन्याय : महत्त्वाची पदे देण्यास राज्य सरकार उदासीन

विलास गावंडे - यवतमाळशासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यात मागासवर्गीयांचा नोकरीतील अनुशेष सतत वाढतो आहे. सरळ सेवा भरतीचा अनुशेष २ लाख ३४ हजार तर पदोन्नतीचा ७३ हजार इतका आहे. महाविद्यालये, विद्यापीठ, सहकारी संस्था आणि विविध प्रकारच्या महामंडळांमध्ये हा अनुशेष अधिक असल्याचे सांगितले जाते.राज्यात अलीकडे काही वर्षात मोठ्या प्रमाणात पदभरती झाली असली तरी त्यात मागासवर्गीयांसाठी अधिक पदे नव्हती. परिणामी अनुशेष वाढत गेला. पदोन्नतीमध्येही हाच प्रकार सुरू आहे. पात्र उमेदवार असतानाही त्यांना स्थान मिळत नाही. सर्वाधिक एक लाख ३० हजार एवढा अनुशेष शासनाच्या अधिपत्याखाली असलेली महाविद्यालये, विद्यापीठे, सहकारी संस्था, एसटी महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ आदी संस्थांमध्ये आहे. यावरुन मागासवर्गीयांना महत्त्वाच्या जागांवर नियुक्ती देण्यात शासनाची भूमिका उदासीन असल्याचे दिसून येते. मंत्रालयातील अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव या संवर्गात अनुसूचित जातीचे चार तर अनुसूचित जमातीचे केवळ दोन अधिकारी आहेत. राज्यातील सहा विभागीय महसूल आयुक्तांमध्ये एकही अनुसूचित जातीचा वा जमातीचा नाही. तर ५० जिल्हाधिकाऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचे अवघे बोटावर मोजण्याइतके आहेत.अनुसूचित जातीचे चार, अनुसूचित जमातीचे केवळ दोन जिल्हाधिकारी आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये अनुसूचित जातीचा केवळ एक अधिकारी आहे. अनुसूचित जमातीच्या दोन अधिकाऱ्यांना सीईओ पदावर स्थान मिळाले आहे. २५ मे २००९ च्या शासन निर्णयानुसार अनुशेष भरण्यास आणि पदोन्नती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध सहा महिन्यांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुशेष वाढला असतानाही या निर्णयानुसार कुणालाही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे मागास प्रवर्गामध्ये शासनाप्रती कमालीचा असंतोष वाढत आहे.