शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नागपुरात परत अकराशेहून अधिक ‘कोरोना’बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत परत एकदा ‘कोरोना’चा धोका वाढला असून आकडा अकराशेच्या पार गेला आहे. ‘कोरोना’च्या लसीकरणाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीत परत एकदा ‘कोरोना’चा धोका वाढला असून आकडा अकराशेच्या पार गेला आहे. ‘कोरोना’च्या लसीकरणाला सुरुवात झाली असताना वाढलेले आकडे चिंता वाढविणारे आहे. बुधवारी जिल्ह्यात १ हजार १५२ नवीन रुग्णांची भर पडली तर ६ जणांचा मृत्यू झाला. जर चाचण्यांच्या तुलनेत टक्केवारी काढली तर ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचे प्रमाण ९.८० टक्के इतके आहे.

बुधवारी जिल्ह्यामध्ये एकूण ११ हजार ७५० चाचण्या झाल्या. यातील १ हजार १५२ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आले. ८९७ रुग्ण हे शहरातील असून, ग्रामीणचा आकडा २५२ इतका आहे. शहरातील दोन तर ग्रामीणमधील एका ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू झाला. तीन मृत्यू हे जिल्हाबाहेरील रुग्णांचे होते.

सव्वानऊ हजार ‘अ‍ॅक्टिव्ह’ रुग्ण

बुधवारी जिल्ह्यामध्ये एकूण ९ हजार २९५ ‘अ‍ॅक्टिव्ह’ रुग्ण होते. त्यात शहरातील ७ हजार ६३१ तर, ग्रामीणमधील १ हजार ६६४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या १ लाख ५२ हजार ८१२ वर पोहोचली असून, ४ हजार ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण २ हजार २३० रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत.

चौकट

-दैनिक चाचण्या :११, ७५०

- बाधित रुग्ण : १,५२,८१२

- बरे झालेले : १,३९,१६०

-‘अ‍ॅक्टिव्ह’ रुग्ण : ९,२९५

- मृत्यू : ४,३५७

बुधवारची आकडेवारी

भाग- ‘आरटीपीसीआर’ चाचण्या -रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या-बरे झालेले रुग्ण

ग्रामीण-१,८४१-२,४८३- १४७

शहर-६,६५३- ७७३ - ५४८

दवाखान्यात भरती असलेले रुग्ण

इस्पितळ -रुग्णसंख्या

मेडिकल- १७१

मेयो- ७६

एम्स- ४९

आयजीआर- ३२

इतर-२,३३०