शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

‘सर्जिकल स्ट्राईक डे’कडे महाविद्यालयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:18 AM

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ हा शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांनी याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. आश्चर्याची बाब म्हणजे उच्च शिक्षण विभागाकडून यासंदर्भात शुक्रवारी सूचना प्राप्त झाली. त्यामुळे विद्यापीठाने पाठविलेला संदेश अनेक महाविद्यालयांना उशिरा प्राप्त झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : एक दिवस अगोदर प्राप्त झाल्या प्रशासनाला सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ हा शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांनी याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. आश्चर्याची बाब म्हणजे उच्च शिक्षण विभागाकडून यासंदर्भात शुक्रवारी सूचना प्राप्त झाली. त्यामुळे विद्यापीठाने पाठविलेला संदेश अनेक महाविद्यालयांना उशिरा प्राप्त झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्याने ‘सर्जिकल स्ट्राईक’ पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर या मुद्यावरुन राजकारणदेखील तापले होते. हा दिवस देशभरात ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ म्हणून साजरा व्हावा, असा विचार केंद्र शासनाकडून करण्यात आला. त्याअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाने २० सप्टेंबर रोजी सर्व विद्यापीठांनी ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ साजरा करावा व सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांना बोलावून विद्यार्थ्यापर्यंत सैन्याची शौर्यगाथा पोहोचेल यादृष्टीने कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.याबाबत राज्य शासनानेदेखील २६ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित केला. शौर्यदिवसाच्या निमित्ताने भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा. माजी सैनिकांसमवेत ‘सेल्फी’ काढून ते ‘अपलोड’ करण्याबाबतदेखील राज्य शासनाने निर्देश दिले होते.मात्र प्रत्यक्षात राज्य शासनाचे हे निर्देश विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांकडून नागपूर विद्यापीठाला २८ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले. त्यानंतर तातडीने सर्व महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांना सूचना पाठविण्यात आल्या. मात्र अनेकांना सूचना प्राप्तच झाल्या नाही. शिवाय महाविद्यालयांना तयारीसाठीदेखील वेळ मिळाला नाही. त्यामुळे काही अपवाद सोडले तर बहुतांश ठिकाणी शौर्य दिवस साजराच झाला नसल्याची स्थिती होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.महाविद्यालयांकडून अहवाल मागविणारयासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांना संपर्क केला असता त्यांनी शौर्य दिवसाबाबत उच्च शिक्षण विभागाकडून शुक्रवारी निर्देश प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले. आम्हाला सूचना मिळताच आम्ही याबाबतची माहिती सर्व संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांना दिली. आता किती जणांनी यानुसार आयोजन केले याची माहिती आम्ही त्यांच्याकडून अहवालाच्या माध्यमातून मागविली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.‘सेल्फी’ तर निघालाच नाहीराज्य शासनाच्या निर्देशांनुसार महाविद्यालयांमध्ये माजी सैनिकांना बोलविण्याचे निर्देश होते. माजी सैनिकांसमवेत ‘सेल्फी’ काढून ते ‘अपलोड’ करण्याबाबतदेखील राज्य शासनाने निर्देश दिले होते. मात्र महाविद्यालयांत कार्यक्रमच झाले नाही. त्यामुळे माजी सैनिकांसमवेत ‘सेल्फी’चा मुद्दा हा कागदांवरच राहिला.

 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकcollegeमहाविद्यालय