शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोलिसांचे ‘कोरोना’ला बच्चनस्टाईल आव्हान; जब तक ये खेल खतम नहीं होता, अपुन इधरिच है...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:56 IST

कोरोनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून घराबाहेर पडण्याची धास्ती निर्माण निर्माण झाली आहे. या भयावह परिस्थितीला न घाबरता नागपूर पोलिसांनी लोकांच्या सेवेसाठी ‘... अपुन इधरिच है’, म्हणत नागरिकांनाही भीतिमुक्त राहण्याचा विश्वास दिला आहे.

ठळक मुद्दे टिष्ट्वटरवरून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जबतक ये खेल खतम नहीं होता, अपुन इधरिच है...’ महानायक अमिताभ बच्चनच्या एका चित्रपटातील हा डॉयलॉग अजूनही अनेकांना आठवत असेल. जीवावर उठलेल्या अनेक गुंडांना एकटा अन् धीरगंभीरपणे आव्हान देणारा अमिताभ कसा रुबाबदार वाटत होता त्यावेळी. महानायकाचा हाच अंदाज अन् डायलॉग आज नागपूर पोलिसांनी मारला. मात्र, गुंडांना, समाजकंटकांना नव्हे तर जगावर भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या ‘कोरोना’ला उद्देशून होय.कोरोनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून घराबाहेर पडण्याची धास्ती निर्माण निर्माण झाली आहे. या भयावह परिस्थितीला न घाबरता नागपूर पोलिसांनी लोकांच्या सेवेसाठी ‘... अपुन इधरिच है’, म्हणत नागरिकांनाही भीतिमुक्त राहण्याचा विश्वास दिला आहे. पोलिसांचा हा खमकेपणा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.नागपूर पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवर नेहमीच विविध विषयाला अनुसरून अत्यंत आशयपूर्ण ट्विट केले जाते. लाखो नेटकऱ्यांसाठी ते लक्ष वेधणारे असते.शहर पोलिसांचे ट्विटर अकाउंट नेहमीच चर्चेत असते. मध्यंतरी रणवीर सिंगने स्वत:चा टपोरी टाईप अंदाजातील एक फोटो ट्विट केला होता. त्याच्या हातात लॅण्डलाईनचा रिसिव्हर दिसत होता अन् त्याचे कॅप्शनवजा प्रश्न होता ‘करू क्या डायल नंबर...शहर पोलिसांनी तो रिट्विट करून ह्यडायल हंड्रेड’ असे सूचक उत्तर दिले होते. अर्थात् १०० नंबरवर डायल कर, असे हे रिटिष्ट्वट होते. नेटकऱ्यांनी ते भलतेच उचलून धरले होते. त्या दिवशी संपूर्ण दिवसभर डायल -१०० सोबत रणवीर ट्रोल होत होता.शहर पोलिसांचे आणखीही असेच काही ट्विट चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. आज पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोलीस ठाण्यात मास्क लावून कार्यरत असलेल्या पोलिसांचा फोटो अपलोड केला आहे. त्याखाली ‘जब तक ये खेल खतम नहीं होता अपुन इधरिच है’ असे लिहिले आहे. पोलिसांनी यातून आपला धीरोदात्तपणा दर्शवितानाच ‘ तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत...’ असा दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे. नेटकऱ्यांनी या ट्विटला चांगलीच पसंती दिली आहे. दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी केलेल्या या ट्विटला रात्री ८ वाजून १८ मिनिटांपर्यंत २८५ जणांनी रिटिष्ट्वट केले. १०३ कॉमेंटस् दिल्या तर, त्यावर १२७३ जणांनी लाईक्स दिले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस