शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

अन् नागपूरकरांशी बाबासाहेबांचे ऋणानुबंध जुळले; १०० वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:47 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नागपूरशी एक अनोखे नाते आहे. त्यांच्या चळवळीत नागपूरचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. याचा उल्लेख त्यांनी अनेकदा केलेलाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला पहिल्यांदा भेट दिली. त्याला आज १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

ठळक मुद्देबहिष्कृत समाजाच्या राजकीय हक्काच्या परिषदेचीही शताब्दी

आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नागपूरशी एक अनोखे नाते आहे. त्यांच्या चळवळीत नागपूरचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. याचा उल्लेख त्यांनी अनेकदा केलेलाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला पहिल्यांदा भेट दिली. त्याला आज १०० वर्षे पूर्ण होत आहे. ३० मे १०२० रोजी ते पहिल्यांदा नागपूरला आले आणि त्यानंतर भेटी वाढत जाऊन नागपूरकरांशी त्यांचे ऐतिहासिक ऋणानुबंध निर्माण झाले.३०, ३१ मे आणि १ जून १९२० रोजी नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद आयोजित करण्यात आली होती. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे अस्पृश्य समाजाच्या राजकीय हक्कांच्या मागण्यासंबंधीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली राष्ट्रीय स्तरावरील ही पहिलीच बाहिष्कृत समाजाची परिषद होती. त्यामुळे या परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व होते. कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे या परिषदेचे नियोजित अध्यक्ष होते. गोंदियाचे बाबू कालिचरण नंदागवळी हे स्वागताध्यक्ष आणि गणेश आकाजी गवई व किशन फागुजी बनसोडे हे सेक्रेटरी होते. साऊथबरो कमिटीपुढे २७ जानेवारी १९१९ रोजी मतदानाच्या संदर्भात अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांची कैफियत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या परिषदेत बोलावण्यात आले होते. कस्तूरचंद पार्क (तेव्हाचा आर्सेनल ग्राऊंड)वर ही परिषद बोलावण्यात आली होती.परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा व्यासपीठावर होते. त्यांचे भाषण झाले नाही. परंतु अस्पृश्यांचे राजकीय हक्क प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या परिषदेतील त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे ठरले. ‘अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व न देता त्यांचे हितसंरक्षण उच्चवर्णीय हिंदू प्रतिनिधींच्या हाती सोपवावे,’ असे मत डिप्रेस्ड क्लास मिशनचे वि. रा. शिंदे यांनी साऊथबरो कमिटीसमोर मांडले होते. याविरुद्धचा ठराव डॉ. आंबेडकरांच्या पुढाकारानेच या परिषदेत मंजूर करण्यात आला. पहिल्या दिवशीच्या सभेनंतर रात्री नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत बाबासाहेबांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे यांचे मत बहिष्कृत समाजासाठी कसे घातक ठरेल हे पटवून दिले. त्यानंतर एकमताने याविरुद्धचा ठराव मंजूर झाला.यासोबतच या परिषदेत बहिष्कृत समाजास राजकीय प्रतिनिधित्व देणे, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र खाते निर्माण करणे, स्थानिक स्वराज्य संस्थानात प्रतिनिधी घेणे आणि मुलांना आणि मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणे, असे महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक ठरावही परिषदेत मंजूर करण्यात आले. या परिषदेनंतर बाबासाहेबांचे काम अधिक गतीने सुरू झाले. आंदोलने झाली. नागपूरकर त्यांच्या कार्याशी, चळवळीशी अधिक जुळले. दुसºया गोलमेज परिषदेत बाबासाहेबांना सहभागी करून घेण्यासाठी नागपुरातून लंडनला अनेक तारा करण्यात आल्या. पुढे अनेक महत्त्वाच्या परिषदा, निवडणूक यानिमित्ताने त्यांचे नागपूर व विदर्भात येणे वाढले आणि शेवटी बौद्ध धम्माची ऐतिहासिक धम्मदीक्षा घेण्यासाठीही त्यांनी नागपूरचीच निवड केली.छत्रपती शाहू महाराजांची भव्य मिरवणूकछत्रपती शाहू महाराज यांचे नागपूरच्या भारतीय बहिष्कृत परिषदेला येणे ही अस्पृश्यांच्या चळवळीच्या दृष्टीने फार मोठी घटना होती. नागपुरात छत्रपती शाहू महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. महाराजांच्या या मिरवणुकीत कोणताही लवाजमा नव्हता. ही मिरवणूक साधी परंतु ऐतिहासिक होती. नागपुरातील अस्पृश्य बांधवांनी अतिशय आपुलकीने ही मिरवणूक ३० मे १९२० रोजी काढली होती. तत्पूर्वी शाहू महाराज यांच्या रेल्वे प्रवासातही त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रेल्वे स्टेशनच्या वरच्या माळ्यावर त्यांच्यासाठी फलाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. बफसाहेब यांच्या बंगल्यावर त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था केली गेली. सायंकाळी ५ वाजता मिरवणुकीने त्यांना परिषदेच्या ठिकाणी नेण्यात आले. 

 

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर