शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

वृक्षतोडीने गहिवरलेल्या ‘बाबां’नी कोरली स्मरणशिला

By admin | Updated: February 4, 2015 00:53 IST

इमारती बांधताना अविचारीपणे हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय कागदोपत्रीच रंगविला जातो. या विषयावर मोठमोठी भाषणे ठोकली जातात.

३६ वर्षे पूर्ण : आनंदवनमध्ये ‘त्या’ स्मृतींना उजाळासाईनाथ कुचनकार - चंद्रपूरइमारती बांधताना अविचारीपणे हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय कागदोपत्रीच रंगविला जातो. या विषयावर मोठमोठी भाषणे ठोकली जातात. मात्र कळत-नकळत आनंदवनच्या स्थापनेसाठीही अनेक वृक्षांची आहुती द्यावी लागली होती. तेव्हा बाबा खूप व्यथित झाले होते. त्यानंतर त्यांनी हजारो वृक्षांची लागवड केली. मात्र आहुती दिलेल्या वृक्षांचे कायम स्मरण राहावे, यासाठी त्यांनी आनंदवनात अनामवृक्षांची स्मरणशिला कोरली. या कोनशिलेला ३६ वर्षे पूर्ण झाली. कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबांचे निसर्गावरही तेवढेच प्रेम होते, हेच या स्मरणशिलेवरून अंकित होते. आनंदवनमुळे समाजाने वाळीत टाकलेल्या हजारो कृष्ठरुग्णांना आधार मिळाला. एकीकडे त्यांना आधार मिळाला असला, तरी त्यासाठी अनेक वृक्षांची तोड करावी लागली. वृक्षतोडीमुळे बाबांचे मन हेलावले. त्यामुळे बाबांनी आनंदवनात ४ फेब्रुवारी १९७९ रोजी ‘अमनवृक्षाची स्मरणशिला’ स्थापन केली. त्या वृक्षांचे स्मरण आजही आनंदवनमध्ये होत आहे.आदर्श घेतील काय?आनंदवन उभारताना शेकडो वृक्षांचा बळी गेला. त्यानंतर त्यापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. आज रस्ता चौपदरीकरणासाठी हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. वृक्ष हटविताना त्या वृक्षाच्या मोबदल्यात १० वृक्ष लावण्याची हमी द्यावी लागते, त्यानंतरच ते वृक्ष संबंधित ठिकाणाहून हटविण्यास परवानगी दिली जाते. परंतु, १० वृक्ष तर सोडा एक वृक्षही जगविण्यासाठी कुणी धडपडत नाही. कुणालाही त्याचे सोयरसुतक वाटत नाही. बाबांच्या या कार्याचा आदर्र्श साऱ्यांनीच घ्यायला हवा.