शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅक्रीटेशन’साठी आयुर्वेदला अल्टिमेटम

By admin | Updated: March 20, 2017 02:01 IST

सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे येत्या दोन वर्षात, तर रुग्णालयाचे वर्षभरात

भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे प्रशासनाला पत्र नागपूर : सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे येत्या दोन वर्षात, तर रुग्णालयाचे वर्षभरात ‘अ‍ॅक्रीटेशन’ (प्रमाणन) करा, असे निर्देश केंद्रीय परिषदेने पत्र पाठवून आयुर्वेदला दिल्याने प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. आयुर्वेद महाविद्यालयामध्ये दरवर्षी पदवी(यूजी)च्या १०० विद्यार्थ्यांना, तर पदव्युत्तर(पीजी)च्या ८४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या(सीसीआयएम)मानकानुसार कॉलेज व रुग्णालयात शिकविण्यात येणाऱ्या सर्व विषयात ‘पीएच.डी.’ असणे आवश्यक आहे. पण सध्या केवळ तीन विषयात ‘पीएच.डी.’ असून, शिक्षकांअभावी उर्वरित ११ विषयातील ‘पीएच.डी.’ही प्रतीक्षेत आहे. ‘सीसीआयएम’ने डिसेंबर २०१६ मध्ये पत्र पाठवून परिषदेच्या निकषानुसार सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश आयुर्वेद प्रशासनाला दिले आहे. १८० वरून ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रशासनाने राज्य शासनाकडे दोन महिन्यांपूर्वी परवानगीसाठी पाठविले आहे. शिवाय पाचपैकी राज्य शासनाकडून तीन वसतिगृह बांधकामांना मंजुरी मिळाली आहे. मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, फर्निचर व बांधकाम आदींची पूर्तता करून रुग्णालयाचे ‘अ‍ॅक्रीटेशन’ २०१८ पर्यंत, तर महाविद्यालयाचे ‘अ‍ॅक्रीटेशन’ २०१९ पर्यंत करण्याचे आदेश परिषदेने पत्राद्वारे प्रशासनाला दिले आहे. निकष पूर्ततेनंतर परिषदेचे पाच सदस्यीय चमू येऊन तपासणी करणार आहे. त्यानंतरच प्रवेशित विद्यार्थी संख्या नियमित ठेवायची की नाही, याबाबत निर्णय घेऊन ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे निकषांची पूर्तता करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.(प्रतिनिधी) निकषानुसार भरावी लागणार पदे सध्या कॉलेज व रुग्णालयात वर्ग १ ची ६४ पदे असून, वर्ग १ व २ च्या एकूण १२ जागा वाढवायच्या आहेत. मॉडर्न मेडिकल अधिकाऱ्यांच्या ११ जागा भरायच्या आहेत. वर्ग ३ ची ७२ पदे, तर नर्सिंगची ८० पदे भरावयाची आहेत. वर्ग ४ ची तब्बल १०८ पदे भरावयाची आहेत. या सर्व रिक्त जागा राज्य शासनाला भराव्या लागणार आहेत.