शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदिक विद्यार्थी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:38 IST

वसतिगृहातील समस्येकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना त्रास देणाºया वसतिगृह अधीक्षकांच्या बदलीला घेऊन व अधिष्ठाता यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदवीच्या ५० वर विद्यार्थी व इंटर्न यांनी मिळून .....

ठळक मुद्दे वसतिगृह अधीक्षक बदलण्याची मागणी : समस्या मांडल्यास काढून टाकण्याची देतात धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वसतिगृहातील समस्येकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना त्रास देणाºया वसतिगृह अधीक्षकांच्या बदलीला घेऊन व अधिष्ठाता यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदवीच्या ५० वर विद्यार्थी व इंटर्न यांनी मिळून मंगळवारी सकाळपासून संप पुकारला. उद्या बुधवारी हे विद्यार्थी जिल्हाधिकाºयांना आपले निवेदन देणार आहेत.शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थी व वसतिगृह अधीक्षक डॉ. मिलिंद कांबळे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. संपावर गेलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावर आम्हाला गुंड म्हणतात, तर डॉ. कांबळे आम्हाला गुंडगिरी करीत असल्याचे संबोधतात. पदवी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पदव्युत्तर विद्यार्थी राहू देतात; पण इंटर्न विद्यार्थ्यांना राहणे नियमबाह्य असल्याचे सांगून अधिष्ठाता व वसतिगृह अधीक्षक महाविद्यालयातून काढून टाकण्याची धमकी देतात. गेल्या वर्षी वसतिगृहातील ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी होती, अशा निवडक ३० विद्यार्थ्यांकडून ७२ हजार रुपये अवैधपणे वसूल केले. त्यातून चार वॉटर कूलर घेतले. सध्या हे वॉटर कूलर धूळखात पडले आहेत. वसतिगृह अधीक्षक वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्रास देऊन ‘इंटरनल बॅक’ ठेवण्याची धमकी देतात, याला त्रासाला कंटाळून मंगळवारी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संप पुकारला.बुधवारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे, त्यानंतरही कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असेही विद्यार्थी म्हणाले.शिस्त महत्त्वाचीविद्यार्थ्यांची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाची असते. यामुळे वसतिगृहात शिस्तीचे पालन होणे महत्त्वाचे आहे. वसतिगृह अधीक्षक याकडे विशेष लक्ष देऊन असताना त्यांना विरोध होत आहे, तरीही विद्यार्थ्यांची समजूत काढणे सुरू आहे.-डॉ. गणेश मुक्कावारअधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय