शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील कम्पाऊं डर होणार आयुर्वेद वैद्य

By admin | Updated: September 18, 2015 02:50 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागात आयुर्वेद कम्पाऊं डर पदावर कार्यरत परंतु बीएएमएस पदवी प्राप्त केलेल्यांना आयुर्वेद वैद्य या पदावर पदोन्नती दिली जाणार आहे.

१७ पदे भरणार : प्रस्ताव सभागृहात मांडणारनागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागात आयुर्वेद कम्पाऊं डर पदावर कार्यरत परंतु बीएएमएस पदवी प्राप्त केलेल्यांना आयुर्वेद वैद्य या पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. बुधवारी होणाऱ्या मनपाच्या सभेत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मनपाच्या आरोग्य विभागातील आयुर्वेद वैद्यची १७ पदे भरली जाणार आहेत. यातील ७५ टक्के पदे जाहिरातीद्वारे तर २५ टक्के पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव आहे. आयुर्वेद कम्पाऊं डर या पदावरून पदवीधर वैद्य पदावर पदोन्नती करावयाची असल्यास जे बीएएमएस अशी शैक्षणिक पात्रता धारण करीत असेल व १० वर्षांचा अनुभव असेल अशांनाच यासाठी पात्र धरले जाणार आहे. मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या काही आयुर्वेद कम्पाऊं डर यांच्याकडे आयुर्वेदिक विशारद, वैद्य विशारद व आयुर्वेद रत्न अशा स्वरूपाच्या पदव्या आहेत. परंतु त्या आयुर्वेद वैद्य पदासाठी ग्राह्य धरता येणार नाही, असा अभिप्राय शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी दिला आहे. १९७१ सालापासून भारतात बीएएमएस ही आयुर्वेदाची एकमेव पदवी आहे. याव्यतिरिक्त कोणतीही पदवी यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही. मनपाच्या आरोग्य विभागातील मलवाहक जमादार या पदावर पदोन्नतीबाबत धोरण ठरविण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला जाणार आहे. जे सफाई कर्मचारी दहावी पास असून एस.आय. कोर्स केलेला आहे, अशा कर्मचाऱ्यांकरिता ५० टक्के जागा पदोन्नतीने, ज्येष्ठता, योग्यता व आरक्षण लक्षात घेता पदोन्नती राखून ठेवण्याचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)