शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्सीस बँकेच्या अधिका-यांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 16:42 IST

चंद्रपूरच्या तरुणाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याच्या नावे बँक अधिका-याने गैरव्यवहार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.

नागपूर, दि. 12 -  चंद्रपूरच्या तरुणाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याच्या नावे बँक अधिका-याने गैरव्यवहार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी अ‍ॅक्सीस बँकेच्या सिव्हील लाईन शाखेच्या अधिका-यासह चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. अनिल वर्मा, समीर जोशी, ओम दिवान, युवराज ठाकरे अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल वर्मा अ‍ॅक्सीस बँकेच्या करेंसी कार्ड विभागाचे व्यवस्थापक असून, समीर जोशी रामदासपेठेतील वॉलस्ट्रीट फॉरेक्स, लि. कंपनीचे व्यवस्थापक आहे. ही कंपनी विदेशी चलनाच्या अदलाबदलीचे काम करते, असे पोलीस सांगतात. दिवान आणि ठाकरे हे त्यांचे साथीदार आहेत. 

चंद्रपूरच्या अरविंदनगरात राहणारे हरविंदरसिंग बजराजसिंग वधावन (वय २८) म्युच्युअल फंडांचे काम करतात. मार्च २०१६ मध्ये हरविंदरसिंग यांना त्यांच्या नावाचे ट्रॅव्हल्स करेन्सी कार्ड आणि बनावट व्हीजा तयार करण्यात आल्याचे माहित पडले. यासाठी उपरोक्त आरोपींनी हरविंदरसिंगच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्यांच्या बनावट स्वाक्ष-या करून त्याचा गैरवापरही केला. ही बनवाबवनी माहित झाल्यानंतर हरविंदरसिंग यांनी संबंधितांकडे संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. 

त्यामुळे त्यांनी ८ मार्च २०१६ ला सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर या प्रकरणात वर्मा, जोशी, दिवान आणि ठाकरे या चौघांविरुद्ध फसवणूकीच्या आरोपाखाली शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.

व्यवहार अंधारात ट्रॅव्हल्स करेन्सी कार्ड आणि बनावट व्हीजा तयार करून त्याचा गैरवापर केल्याचे पोलीस रेकॉर्डवर आले आहे. मात्र, नेमका व्यवहार कोणता झाला, ते कळायला मार्ग नाही. आरोपींनी आर्थिक गैरव्यवहार केला की आणखी काही, त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगतात.