देखण्या स्वागत कमानी...फुलांचा स्वर्गीय दरवळ...भगवे फेटे घातलेल्या तरुणांचे शिस्तबद्ध संचलन...मुखी प्रभू श्रीरामाचा अखंड जयघोष...नभात तळपणाऱ्या सूर्यनारायणाची बाह्य ऊर्जा अन् भक्तांच्या अंतरातील चैतन्य जागविणारी आंतरऊर्जा यांचा दैवी संगम... अशा श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून पारंपरिक शोभायात्रा निघाली अन् यात सहभागी ७७ चित्ररथांच्या चैतन्ययात्रेमुळे संपूर्ण नागनगरी ‘अवघाची राम’ जाणवायला लागला. मंगळवारी रात्री हे दिव्य रथ मुंजे चौकात आले तेव्हा आकर्षक विद्युत रोषणाईने रथ झगमगून गेले होते. यावेळी रथावरील रोषणाई पाहून उपस्थितांचे डोळे दिपले. अनेकांचे या झगमगणाऱ्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि या रथाचे छायाचित्र काढून घेण्यासाठी हातातले मोबाईल सरसावले.
अवघाची राम!
By admin | Updated: April 5, 2017 02:01 IST