खापा : काेराेना संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच काहींना काेराेना म्युकरमायकाेसिस या आजाराची लागणही झाली आहे. त्यामुळे बडेगाव (ता. सावनेर) जिल्हा परिषद सर्कलमधील गावांमध्ये काेराेना व म्युकरमायकाेसिस या आजाराबाबत जनजागृती केली जात आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनी या दाेन्ही आजारांबाबत सतर्क राहावे. मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, गर्दी करणे व गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे यांनी केले. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावातील नागरिकांना काेराेना व म्युकरमायकाेसिस या आजाराची लक्षणे, औषधाेपचार, उपचाराच्या साेयी त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी यांसह अन्य महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली जात आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या अभियानात उपविभागीय अधिकारी अरुण कुसळकर, जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे, खंडविकास अधिकारी गरूड, पंचायत समिती सदस्य गणेश काकडे, विस्तार अधिकारी गुंजनकर, मंडळ अधिकारी माेरे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत व आराेग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व काही नागरिक सहभागी झाले आहेत.