शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अविनाश वारजूकरांना तात्पुरता दिलासा

By admin | Updated: March 9, 2017 02:37 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी काँग्रेसचे चिमूर येथील माजी आमदार

हायकोर्ट : वैद्यकीय उपचारासाठी नागपूर प्रवेशाची अनुमती नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी काँग्रेसचे चिमूर येथील माजी आमदार अविनाश वारजूकर यांना धंतोलीतील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ७ दिवस नागपुरात राहण्याची परवानगी दिली. धंतोली पोलीस ठाण्यात रोज हजेरी नोंदविण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली. तसेच, त्यांना येत्या १७ मार्च रोजी उपचारासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यास सांगण्यात आले. प्रकरणावर न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१६ रोजी वारजूकर यांना बलात्कार प्रकरणात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या निर्णयातील एका अटीनुसार वारजूकर यांना सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होतपर्यंत नागपुरात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यावेळी न्यायालयात उपस्थित तपास अधिकाऱ्याने एक महिन्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल अशी माहिती दिली होती. परंतु, अद्यापही दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. परिणामी वारजूकर यांनी नागपुरात प्रवेश करण्याची व राहण्याची परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आरोग्य तपासणीसह विविध कारणांसाठी नागपुरात येणे गरजेचे आहे. परिणामी संबंधित अटीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी २७ जुलै २०१६ रोजी वारजूकर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (बलात्कार) अन्वये एफआयआर नोंदविला आहे. वारजूकर यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)