शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांनी केली प्रवाशांची लूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 21:27 IST

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऑटो बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. परंतु तरीसुद्धा रेल्वेस्थानकावर काही ऑटोचालक सक्रिय होते. त्यांनी रेल्वेस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांकडून चौपट भाडे आकारून प्रवाशांची लूट केली.

ठळक मुद्देआकारले चौपट भाडे : अनेक प्रवासी पायीच गेले घरी

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऑटो बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. परंतु तरीसुद्धा रेल्वेस्थानकावर काही ऑटोचालक सक्रिय होते. त्यांनी रेल्वेस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांकडून चौपट भाडे आकारून प्रवाशांची लूट केली.

नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी ११.०५ वाजता नवी दिल्ली-विशाखापट्टनम ही गाडी आली. या गाडीतून १५० प्रवासी उतरले. काही मोजक्या प्रवाशांचेच नातेवाईक त्यांना घेण्यासाठी आले होते. उर्वरित प्रवाशांना शहरातील वेगवेगळ्या भागात जायचे होते. परंतु ऑटो बंद असल्यामुळे काही ऑटोचालकांनी आपले ऑटो रेल्वेस्थानकाच्या आजूबाजूला दुरवर उभे केले होते. रेल्वेस्थानकाच्या बाहेर उभ्या असलेल्या प्रवाशांशी ते पैशांसाठी वाटाघाटी करताना आढळले. डिप्टी सिग्नलला जाण्यासाठी ६०० रुपये, नंदनवनसाठी ५०० रुपये, केडीके कॉलेज ६०० रुपये, नरेंद्रनगर ४०० रुपये, मानेवाडा ५०० रुपये, सदर ३०० रुपये, मिनिमातानगर ५०० रुपये असे भाडे ऑटोचालक प्रवाशांना सांगत होते. सौदा पक्का झाल्यानंतर प्रवाशांना एका ठिकाणी उभे करून ते ऑटो घेऊन येत होते. अशाप्रकारे आॅटोचालकांनी प्रवाशांची लूट केली.ऑटोचालकांनी आकारलेले भाडेडिप्टी सिग्नल ६०० रुपयेसीताबर्डी १०० रुपयेनंदनवन ५०० रुपयेकेडीके कॉलेज ६०० रुपयेनरेंद्रनगर ४०० रुपयेमानेवाडा ५०० रुपयेसदर ३०० रुपयेमिनिमातानगर ५०० रुपयेनाईलाजास्तव मोजले पैसेरेल्वेस्थानकावर उतरलेल्या बहुतांश प्रवाशांजवळ दोन ते तीन बॅग होत्या. पायी जाणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव ऑटोचालकांनी सांगितलेले अव्वाच्या सव्वा भाडे देणे त्यांना भाग पडले. प्रवाशांच्या या मजबुरीचा फायदा ऑटोचालक घेत असल्याचे चित्र दिसले.अनेकजण निघाले पायीऑटोचालकांनी सांगितलेले भाडे परवडणारे नसल्यामुळे अनेक प्रवाशांना ते देणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी पाठीवर एक बॅग आणि हातात ट्रॉलीबॅग घेऊन पायीच जाणे पसंत केले. अनेक प्रवाशांनी पायीच आपले घर जवळ केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याauto rickshawऑटो रिक्षा