नागपूर : रेनबो मेडिनोव्हामध्ये एनएबीएल मान्यताप्राप्त कोविड-१९ आरटीपीसीआर आणि अन्य विविध मॉल्युक्युलर चाचणी पूर्णत: स्वयंचलित यंत्राद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे मॅन्युअल त्रुटी होण्याची शक्यता कमी होते. नमुने घरून गोळा केले जातील आणि त्याच दिवशी ४ ते ५ तासात निकाल तयार होईल. वेगवान अहवाल देणारी सेवा आपात्कालीन शस्त्रक्रिया आणि प्रवासी हेतूसाठी मदतनीस ठरेल. या केंद्राला आधीपासूनच सीजीएचएस, डब्ल्यूसीएल, ईएसआयएस, ईसीएचएस यांनी मान्यता दिली आहे आणि लाभार्थी मंजूर दरावर या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय मॉल्युक्युलर प्रयोगशाळेचा उपयोग एनएएटी (न्यूक्लिक अॅसिड एम्प्लिफिकेशन टेस्ट) टेस्टिंग एचआयव्ही, हिपॅटायटीस बी आणि हिपॅटायटीस सी संसर्गाच्या तपासणीसाठीदेखील केला जातो. ब्लड बँक ही उपकरणे रक्त आणि रक्त उत्पादनांच्या चाचणीसाठी वापरत आहे. त्यामुळे रक्तदात्यांकडून होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण शून्य असते. मशीनची एकाच वेळी ९६ नमुने प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. रेनबो मेडिनोव्हाचे संचालक डॉ. आर.बी. दखणे व्हायरल इन्फेक्शनच्या निदानासाठी लवकरच विविध चाचण्या सुरू करण्याची योजना आखत आहेत. याकरिता मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. स्नेहा येळणे, वरिष्ठ पॅथालॉजिस्ट डॉ. मुझुमदार आणि डॉ. सौम्या यांच्यासमवेत खास प्रशिक्षित वरिष्ठ तंत्रज्ञ उत्तम सेवा देणार आहेत. (वा.प्र.)
रेनबो मेडिनोव्हामध्ये स्वयंचलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST