शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील आॅटोचालकाची पोलीसभक्ती; दुपारी देतो नि:शुल्क सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 12:15 IST

दिवसरात्र ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांना दुपारी १२ ते ५ पर्यंत नि:शुल्क सेवा देण्याचा वसा या आॅटोचालकाने घेतला आहे. प्रशांत श्रीवास्तव नामक या आॅटोचालकाची पोलीसभक्ती नवल आणि प्रेरणेचा विषय ठरली आहे.

ठळक मुद्देपोलिसांमुळे मिळाले दुसरे जीवन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायदा व सुव्यवस्था सांभाळताना सामान्य माणसांची सेवा करणाऱ्या पोलिसांना सामान्य माणसांकडून किती सहकार्य लाभते हा संशोधनाचा विषय. सहकार्य सोडा तर पोलिसांपासून चार हात दूरच राहण्याचा प्रयत्न लोक करीत असतात. शहरातील आॅटोचालकांना तर पोलिसांचा कायम तिटकारा असतो. अशा नकारात्मक परिस्थितीत एक आॅटोचालक मात्र उन्हातान्हात सेवा देणाऱ्या पोलिसांच्या मदतीला धावतो आहे. दिवसरात्र ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांना दुपारी १२ ते ५ पर्यंत नि:शुल्क सेवा देण्याचा वसा या आॅटोचालकाने घेतला आहे. प्रशांत श्रीवास्तव नामक या आॅटोचालकाची पोलीसभक्ती नवल आणि प्रेरणेचा विषय ठरली आहे.प्रशांतच्या मनात ही पोलीसभक्ती कशी जागली, याची कथा रंजक आणि भावनिकही आहे. प्रशांत मूळचा भंडारा येथे राहणारा. १० वर्षापूर्वी वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई प्रशांत व त्याच्या दोन लहान भावंडांना घेऊन गोंदिया जिल्ह्याच्या बिजापूर येथे आपल्या माहेरी आली. त्यावेळी प्रशांतने नुकतीच बारावी पूर्ण केली होती. भावंडांचा सांभाळ व आईला मदत म्हणून तो रोजगाराच्या शोधात नागपूरला आला.सुरुवातीचे चार वर्षे त्याने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम केले. त्यानंतर कंपनीतही काम केले. त्यावेळी थोडे थोडे पैसे गोळा करून त्याने एक आॅटो खरेदी केला. यातून त्याची चांगली कमाई होत होती व आर्थिक स्थैर्य आले होते.मात्र एकदा अचानक आलेल्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्याने जीवनच संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता आणि तसा प्रयत्नही केला. नेमक्या त्यावेळी प्रशांतला पोलिसातील देवदुताचे दर्शन घडले. धंतोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माने यांनी अशा संकटाच्या भावनिक वेळी त्याचे समुपदेशन व मार्गदर्शन करीत त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी मदत केली.माने यांच्यामुळेच आपल्याना दुसरे जीवन मिळाल्याचे तो मानतो. कोणत्याही परिस्थितीचा व संकटाशी सामना करण्याची ताकद मिळाल्याचे तो सांगतो. दरम्यानच्या काळात प्रशांतने दोन आॅटो खरेदी केले व लग्नही केले. आज तो पत्नी, आई व भावंडांचा सक्षमपणे सांभाळ करू शकत आहे. मात्र पीआय माने यांनी केलेल्या मदतीची जाणीव त्याला होती. या मदतीची परतफेड म्हणून त्याने आॅटोच्याच माध्यमातून पोलिसांच्या सेवेचे व्रत स्वीकारले.ड्युटी बजावताना पोलिसांना इकडे तिकडे फिरावे लागते. कधी आरोपीला कोर्टात हजर कर, तर कधी मेडिकलला ने. अशा धावपळीत अनेकदा पोलिसांना अकस्मात प्रसंगांना तोंड द्यावे लागते किंवा कोणत्याही शासकीय कामासाठी धावपळ करावी लागते. अशावेळी प्रशांत एका फोनवर संबंधित पोलिसाच्या मदतीला धावून जातो. स्वत:जवळचे दोन्ही आॅटो या कामी लावले आहेत. एवढेच नाही तर मित्रांचे आणखी दोन आॅटो त्याने पोलीस सेवेत लावले आहेत. ‘दुपारी १२ ते ५ पोलिसांच्या सेवेसाठी नि:शुल्क’ असे आवाहन करीत त्याने आपला मोबाईल क्रमांक त्यावर नमूद केला आहे.प्रशांत यांच्या या सेवाकार्याचे सर्वत्र कौतुक होत असून मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनीही त्याच्या कामाचे कौतुक केले. नुकताच पोलीस निरीक्षक हेमंत खराबे व धंतोलीचे पीआय दिनेश शेंडे यांनी प्रशांतचा सत्कारही केला. पोलिसांबद्दलची त्यांची कृतज्ञता पोलीस व सामान्य नागरिकाचे नाते अधिक मजबूत करणारी आणि कर्तव्यदक्ष पोलिसांमधील हळव्या माणुसकीला सलाम करणारी आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस