शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
2
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
3
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
4
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
5
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
6
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
7
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
8
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
9
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
11
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
12
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
13
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
14
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
15
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
16
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
17
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
18
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
19
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
20
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

आॅटो मीटरची सक्ती सोमवारपासून

By admin | Updated: August 29, 2014 01:02 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने १ सप्टेंबरपासून आॅटोरिक्षा मीटरने चालण्याची सक्ती केली आहे. याच्या अंमलबजावणीसाठी आरटीओने चार पथकांवर जबाबदारी दिली आहे.

चार पथकांकडून तपासणी : दोषींकडून तीन पट दंडाची वसुलीनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने १ सप्टेंबरपासून आॅटोरिक्षा मीटरने चालण्याची सक्ती केली आहे. याच्या अंमलबजावणीसाठी आरटीओने चार पथकांवर जबाबदारी दिली आहे. यात दोषी आढळून येणाऱ्या आॅटोचालकावर तीन पट आर्थिक दंडाची वसुली केली जाणार आहे.शहरात १९९० पासून ते आतापर्यंत सहावेळा आॅटोचालकांना मीटरने चालण्याची सक्ती करण्यात आली. परंतु, प्रत्येकवेळा ती बारगळली, हे विशेष. १ जानेवारी २०११ रोजी आॅटो मीटर सक्तीची विशेष मोहीम उघडली होती. परंतु, शहरातील आॅटोचालकांनी याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मीटरनुसार न चालणाऱ्या आॅटोचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. विनामीटर वाहतूक करणाऱ्या आणि मीटर नसलेल्या आॅटोंविरु द्ध कारवाई झाली. आॅटोचालक संघटनांनीही याच्याविरोधात बंद पुकारला होता. तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी यात लक्ष घातल्याने संप मागे घेण्यात आला. परंतु आॅटोचे मीटर बंदच राहिले. त्यानंतर २०१२ मध्ये पुन्हा नवीन दराचे टेरिफ कार्ड तयार करून मीटरची सक्ती करण्यात आली.कारवाईचा धसका घेत काही दिवस आॅटो मीटरने चालले, परंतु पुढे ही मोहीम थंडबस्त्यात पडली. जून २०१३ मध्ये आरटीओने सर्व आॅटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती केली. त्यामागे आॅटो मीटरने चालावे ही अपेक्षा होती. त्यावेळी तब्बल ५ हजार आॅटोरिक्षांनी इलेक्ट्रॉनिक मीटर बसविले. परंतु आजही आॅटोरिक्षा मीटरविनाच धावत आहे. दरम्यानच्या काळात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी, आरटीओ आणि विविध आॅटो संघटनांची बैठक घेऊन आॅटो मीटरने चालविण्यावर चर्चा केली. यावेळी संघटनांनी अवैध वाहतूक बंद केल्यास व प्रवासी भाड्याचे दर वाढविल्यास हे शक्य असल्याचे मत मांडले. बैठकीत १ सप्टेंबरपासून मीटर सक्ती करण्याचा आणि दोषी आढळून आल्यावर दीड पट दंड आकारणीचा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)तीन हजार रुपये दंडआॅटोरिक्षा परवानाधारकाने मीटर प्रमाण न चालणे, सदोष मीटरचा वापर करणे, मीटर नसताना वाहन वापरणे, मीटर सील तुटलेले असताना वाहनाचा वापर करणे, खोटे दरपत्रक वाहनात ठेवणे आदी कारणांसाठी आॅटोचालकांवर सुधारीत दंडसूची अनुसार विभागीय कारवाई अंतर्गत दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी एक हजार तडजोड शुल्क आणि दोन हजार रुपये विभागीय कारवाई असे एकूण तीन हजार रुपये दंड राहील.नवे टेरिफ कार्ड सोमवारपासूनआॅटोरिक्षाचे नवे टेरिफ कार्ड सोमवारपासून लागू होत आहे. यात पहिल्या प्रती किलोमीटरला १४ रुपये भाडे आकारण्यात येईल. उदा. प्रवाशाला दोन किलोमीटर प्रवास करायचा असेल तर त्याला २८ रुपये प्रवास भाडे पडेल. हे टेरिफ कार्ड आॅटोचालकांच्या फायद्याचे आहे. परंतु नागपुरात अनेक प्रवासी सीटनुसार प्रवास करतात. ते मीटरने कसे चालतील या अडचणीत आॅटोचालक सापडले आहेत.