शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकाला घातला ऑटोचालकांनी विळखा :वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:04 IST

रेल्वेस्थानकाच्या परिसरात नेहमीच वर्दळ राहते. २४ तास प्रवाशांची ये-जा सुरू असते. परंतु रेल्वेस्थानकाच्या सर्वच रस्त्याला ऑटोचालकांनी विळखा घातल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑटोचालकांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागा उरत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देभर रस्त्यात आडवे लावतात ऑटो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानकाच्या परिसरात नेहमीच वर्दळ राहते. २४ तास प्रवाशांची ये-जा सुरू असते. परंतु रेल्वेस्थानकाच्या सर्वच रस्त्याला ऑटोचालकांनी विळखा घातल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑटोचालकांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागा उरत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १३५ ते १४५ रेल्वेगाड्या ये-जा करतात. प्रवाशांची संख्याही ३५ ते ४० हजार असते. परंतु रेल्वेस्थानकावर पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात आणि पश्चिमेकडील भागात ऑटोचालकांनी रेल्वेस्थानकाला विळखा घातल्याची स्थिती आहे. यात ऑटोचालक भर रस्त्यात आपली वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. प्रवाशांना आतमध्ये जाताना आणि बाहेर पडताना जागा उरत नाही. प्रवाशी घेण्यासाठी हे ऑटोचालक रस्त्यात ऑटो उभे करून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवासी शोधण्यासाठी जातात. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन रेल्वेस्थानकाच्या आत येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यांना आतमध्ये जाताना आणि बाहेर पडताना त्रास होतो. या भागात नेहमीच वाहतूक विस्कळीत होते. अनेकदा शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्त्यावरील ऑटोचालक, दुकानदार आदीविरुद्ध कारवाई करण्यात येते. परंतु पोलिसांचे वाहन निघून गेले की पुन्हा हे अतिक्रमण जैसे थे सुरू होते. त्यामुळे या परिसरातील ऑटोचालकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.मुख्य रस्त्यावर अतिक्रमणरेल्वेस्थानकाच्या आत जाण्यासाठी पश्चिमेकडील भागात दोन रस्ते आहेत. यात आरएमएस बिल्डिंग शेजारच्या रस्त्यावर ऑटोचालक दोन्ही बाजूंनी ऑटो उभे करतात. याशिवाय घड्याळ, मोबाईल कव्हर विक्रेते, पानटपरीवाले हे या रस्त्याच्या बाजूलाच उभे राहत असल्यामुुळे प्रवाशांना आत प्रवेश करताना जागा उरत नाहीत. त्यानंतर रेल्वेस्थानकाच्या वाहतूक बूथच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर तर ऑटोचालक ऑटो उभे करून हा रस्ताच बंद करून टाकत असल्याची स्थिती आहे. कार पार्किंगच्या शेजारी रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूलाही ऑटोचालक ऑटो उभे करून हा रस्ता बंद करून टाकतात.मेन गेटमध्ये उभे राहतात ऑटोचालकरेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात प्रवाशांना प्रवेश करण्यासाठी असलेल्या मेन गेटचा ताबाही ऑटोचालकांनी घेतला आहे. या गेटच्या आतमध्ये आणि बाहेर ऑटोचालक प्रवाशी घेण्यासाठी उभे राहतात. त्यामुळे प्रवाशांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागा उरत नसल्याची स्थिती आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने ऑटोचालकांवर कारवाई होताना दिसत नसल्यामुळे ऑटोचालकांचे चांगलेच फावत आहे.संत्रा मार्केट परिसरातही वाहतुकीचा खोळंबानागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरातही ऑटोचालकांनी अतिक्रमण केले आहे. या भागात प्रवेश करण्यासाठी असलेल्या आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर ऑटोचालक ऑटो उभे करीत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर ऑटो उभे राहत असल्यामुळे प्रवाशांना घाईगडबडीत रेल्वे पकडण्यासाठी जाताना त्रास होत आहे. त्यामुळे या भागात वाहतूक विस्कळीत करणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.वाहतूक पोलिसांशी चर्चा करणार‘रेल्वेस्थानकाच्या आत जाण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या रस्त्यांवर ऑटोचालकांनी अतिक्रमण केल्यामुळे रेल्वे प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर ऑटो उभे करणाऱ्या ऑटोचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस उपायुक्तांना भेटून चर्चा करणार आहोत.’भवानी शंकर नाथ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल

 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर