शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आॅटो बंद; नागरिक त्रस्त

By admin | Updated: September 3, 2015 02:40 IST

उपराजधानीतील आॅटोचालक-मालक संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. बंदमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले.

वाहतूक व्यवस्था कोलमडली: ११ हजारांवर आॅटोंची चाके थांबलीनागपूर : उपराजधानीतील आॅटोचालक-मालक संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. बंदमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. असंख्य पालकांना सकाळीच उठून आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी धावपळ करावी लागली. तर रेल्वेस्थानक आणि बसस्थानकावरील प्रवाशांचेही मोठे हाल झाले.नागपूर जिल्हा आॅटो चालक-मालक महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी आॅटो बंदचे आवाहन करण्यात आले. यात शहरातील राष्ट्रवादी आॅटो युनियन रेल्वेस्टेशन, भारतीय आॅटो चालक-मालक युनियन, सक्रिय आॅटोरिक्षा चालक फेडरेशन गणेशपेश बसस्थानक, अजनी रेल्वेस्टेशन, महाराष्ट्र आॅटो चालक युनियन वाडी, रिपब्लिकन पँथर्स आॅटो रिक्षा संघटना इंदोरा, स्कूल आॅटो चालक मंच वर्धा रोड, राष्ट्रीय आॅटो रिक्षा संघटना, पॅथर्स आॅटो रिक्षा फ्रंट गड्डीगोदाम, अन्याय निवारण हक्क संरक्षण आॅटो संघटना इंदोरा, नाग विदर्भ संचालित आॅटो रिक्षा संघटना वर्धमाननगर, पँथर्स टॅक्सी आॅटोरिक्षा चालक मालक संघ ताजबाग, परवानाधारक आॅटो रिक्षा व्यावसायिक अधिकार संघर्ष समिती, एकता आॅटोचालक मालक संघटना बुटीबोरी आदी संघटनांचे हजारो आॅटोचालक सहभागी झाले होते. आंदोलनात आॅटोरिक्षा चालकांसाठी समाज कल्याण बोर्डाचे गठन करावे, अवैध वाहतूक बंद करावी, आॅटो थांब्यांची संख्या वाढवून थांबे फलक लावावे, सहा महिन्याच्या वर लॅप्स झालेल्या परवान्यांचे त्वरित नूतनीकरण करावे, आॅटो चालकांना राहण्यासाठी घर द्यावे, मेट्रो रेल्वेच्या थांब्याजवळ आॅटो थांब्याची व्यवस्था करावी आदी मागण्या आंदोलनात रेटून धरण्यात आल्या. यशवंत स्टेडियम येथून दुपारी १ वाजता आॅटोचालकांचा भव्य मोर्चा कस्तुरचंद पार्ककडे निघाला. मोर्चा मुंजे चौक, व्हेरायटी चौक, संविधान चौक या मार्गाने कस्तुरचंद पार्कवर पोहोचला. मोर्चात सहभागी आॅटोचालकांनी विविध घोषणा देऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. कस्तुरचंद पार्कवर मोर्चाचे एका सभेत रूपांतर होऊन तेथे आॅटोचालकांचे गंभीर प्रश्न मांडण्यात आले. त्यानंतर हरिश्चंद्र पवार, मोहन बावणे, भरत लांडगे, प्रिंस इंगोले, मेहबुब अहमद, नियाज अली यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आॅटोचालकांच्या समस्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक बोलविण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. आॅटोचालकांच्या समस्या त्वरित दूर न केल्यास आंदोलन करून हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा आॅटोचालकांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)स्टार बस झाल्या फुल्लआॅटो बंदमुळे स्टार बसमधील गर्दी अचानक वाढली. अनेक जणांनी स्टार बसने प्रवास करून या संकटातून मार्ग काढला. यामुळे शहरातील विविध मार्गावरील स्टार बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. बसस्थानकावरील प्रवाशांचेही हालगणेशपेठच्या मध्यवर्ती बसस्थानकावर उतरल्यानंतर असंख्य आॅटोचालक संबंधित प्रवाशाजवळ येऊन आॅटो हवा आहे काय, याची चौकशी करतात. परंतु बुधवारी मात्र एकही आॅटोचालक दिसला नसल्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांचे हाल झाले. त्यांना आपले सामान घेऊन पायीच निघून जाण्याची पाळी आली.