शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टमध्ये देशभरातील शंभरावर न्यायाधीश नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 10:03 IST

राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या वार्षिक सभेकरिता येत्या ऑगस्टमध्ये देशभरातील शंभरावर न्यायाधीश नागपूरला येणार आहेत.

ठळक मुद्देविधी सेवा प्राधिकरणांची सभापहिल्यांदाच आयोजनाचा बहुमान

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या वार्षिक सभेकरिता येत्या ऑगस्टमध्ये देशभरातील शंभरावर न्यायाधीश नागपूरला येणार आहेत. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व जिल्हा न्यायालयांच्या प्रमुख न्यायाधीशांचा समावेश राहील. ही सभा १७ व १८ ऑगस्ट रोजी सर्व सुविधायुक्त खासगी हॉटेलमध्ये होईल. हॉटेलची निवड अद्याप व्हायची आहे.ही वार्षिक सभा आयोजित करण्याचा बहुमान नागपूरला पहिल्यांदाच मिळाला आहे. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ विधी सेवा उपसमिती यांचे पदाधिकारी ही सभा यशस्वीपणे पार पडावी याकरिता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कार्य करीत आहेत. सभेमध्ये देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणचे कार्यकारी अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग यांच्यासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, झारखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू अ‍ॅन्ड काश्मीर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांतील विधी सेवा प्राधिकरणचे कार्यकारी अध्यक्ष व सचिवपदी कार्यरत न्यायाधीश सहभागी होतील.विधी सेवा प्राधिकरणे गरजू पक्षकारांना नि:शुल्क विधी सेवा पुरवितात. न्यायालयांवरील कामाचा बोजा हलका व्हावा, पक्षकारांना तातडीने समाधानकारक न्याय मिळावा, पक्षकारांचा वेळ, पैसे व परिश्रमाची बचत व्हावी याकरिता तडजोडीयोग्य प्रकरणे लोक न्यायालय व मध्यस्थी प्रक्रियेद्वारे आपसी सहमतीने निकाली काढण्याचे प्रयत्न करतात. विविध माध्यमांद्वारे विधी सेवेविषयी जनजागृती करतात. यासह इतर सर्व कार्यांच्या यशापयशावर सभेमध्ये सखोल विचारमंथन केले जाईल.

१९९८ मध्ये झाली पहिली सभाराज्य विधी सेवा प्राधिकरणांची पहिली वार्षिक सभा १२ सप्टेंबर १९९८ रोजी नवी दिल्ली येथे झाली होती. तेव्हापासून दरवर्षी देशातील विविध शहरात ही सभा घेतली जाते. नागपूरमध्ये ही सभा पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे सभेची जय्यत तयारी सुरू आहे.

टॅग्स :Courtन्यायालय