शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावरील ‘एटीव्हीएम, सीओटीव्हीएम’ बनल्या शोभेच्या वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 11:48 IST

नागपूर रेल्वे स्थानकावर १० ‘एटीव्हीएम’ व ४ ‘सीओटीव्हीएम’ लावण्यात आल्या आहेत. परंतु यातील बहुतांश मशीन्स बंद असल्यामुळे प्रवाशांना भल्यामोठ्या रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करावे लागत आहे.

ठळक मुद्देआऊट आॅफ आॅर्डरचा बोर्ड प्रवाशांना काढावे लागतेय रांगेत उभे राहून तिकीट

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाडीने प्रवास करण्यासाठी तिकीट काढणे आवश्यक आहे. हे तिकीट काढण्यासाठी अनेक पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहेत. यात आयआरसीटीसीची वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप, तिकीट काऊंटरवर काढता येते. याशिवाय नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने ‘एटीव्हीएम’(आॅटोमेटेड तिकीट व्हेंडिंग मशीन) आणि ‘सीओटीव्हीएम’ (कॉईन आॅपरेटेड तिकीट व्हेंडिंग मशीन) उपलब्ध करून दिल्या आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावर अशा १० ‘एटीव्हीएम’ व ४ ‘सीओटीव्हीएम’ लावण्यात आल्या आहेत. परंतु यातील बहुतांश मशीन्स बंद असल्यामुळे प्रवाशांना भल्यामोठ्या रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करावे लागत आहे.बहुतांश प्रवासी ऐनवेळी रेल्वे स्थानकावर पोहोचतात. पोहोचल्यानंतर ते जनरल कोचचे तिकीट खरेदी करून गाडीत बसतात. अनेकदा गाडीची वेळ झालेली असल्यामुळे त्यांना तिकीट काढण्यासाठी धडपड करावी लागते. अशा वेळी जनरल तिकीट काऊंटरवर प्रवाशांची मोठी रांग असल्यामुळे गाडी सुटण्याची भीती राहते.त्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर १० ‘एटीव्हीएम’ आणि ४ ‘सीओटीव्हीएम’ उपलब्ध करून दिल्या आहेत. या मशीन मुख्य आरक्षण कार्यालय परिसर, रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्याजवळील तिकीट कार्यालय आणि संत्रा मार्केटकडील आरक्षण कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. परंतु यातील ४ ‘एटीव्हीएम’ आणि १ ‘सीओटीव्हीएम’ मशीन बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.रेल्वे प्रशासनातर्फे या मशीनची दुरुस्ती करण्यात येते. परंतु एका मशीनची दुरुस्ती केली की काही दिवसातच दुसरी मशीन बंद पडते. यामुळे एकाच वेळी प्रवाशांना सर्वच मशीन उपलब्ध राहत नसल्याचीस्थिती आहे.

रेल्वे प्रशासनाची उदासीनता‘नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने आॅटोमेटेड तिकीट व्हेंडिंग मशीन आणि कॉईन आॅपरेटेड तिकीट व्हेंडिंग मशीन लावल्या आहेत. परंतु या मशीनची देखभाल करण्याप्रती रेल्वे प्रशासन गंभीर नाही. या मशीन नेहमीच बंद राहतात. कधी कधी या मशीनची दुरुस्ती करण्यात येते. मात्र, काही दिवसातच पुन्हा त्या बंद पडतात. रेल्वे प्रवाशांना कमी वेळात तिकीट मिळू शकत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मशीनची देखभाल करणाऱ्या कंपनीला या मशीन त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश देण्याची गरज आहे.’-बसंत कुमार शुक्ला, सचिव भारतीय यात्री केंद्र

लवकरच सुरू होतील मशीन‘नागपूर रेल्वे स्थानकावर ४ एटीव्हीएम आणि १ ‘सीओटीव्हीएम’ मशीन बंद अवस्थेत आहे. या मशीनच्या देखभालीचे काम फोर्ब्स नावाच्या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी मशीनच्या देखभालीचे काम करतात. या प्रतिनिधींना मशीनचे स्पेअर पार्ट मिळत नसल्यामुळे देखभाल होऊ शकत नाही. या मशीन लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.’-कुश किशोर मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर