शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर मोदींची ध्यान साधना

By admin | Updated: April 15, 2017 02:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांना अभिवादन : परिसराची केली पाहणी नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थिकलश आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशासमोर पाच मिनिटे त्यांनी ध्यान साधना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी ११.०५ मिनिटांनी दीक्षाभूमीवर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रामुख्याने उपस्थित होते. स्मारक समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे यांनी दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारावर त्यांचे स्वागत केले आणि पंतप्रधानांना मध्यवर्ती स्मारकात घेऊन गेले. दरम्यान पंतप्रधानांनी परिसरातील बोधीवृक्षाचेही अवलोकन केले. मध्यवर्ती स्मारकात गेल्यावर सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित केली. तसेच पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशासमोरच ते ध्यानस्थ बसले. जवळपास पाच मिनिटे त्यांनी ध्यान साधना केली. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह सर्व उपस्थित पाहुणे हात जोडून उभे होते. यानंतर स्मारकावरील वरच्या डोमवर जाऊन पंतप्रधान मोदी यांनी दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. नंतर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर स्मारक समितीच्या सदस्यांशी चर्चा केली आणि ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघाले. तब्बल २० मिनिटे त्यांनी दीक्षाभूमीवर घालवली. (प्रतिनिधी) दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत राहील... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीवरील व्हिजिट बुकमध्ये आपला अभिप्राय नोंदविला. यात त्यांनी लिहिले आहे की, ‘दीक्षाभूमीवर आज येऊन डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्याचे भाग्य मिळाल्याने मला अतिशय आनंद होत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहील’.