शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उपस्थिती १० टक्के, पण उत्साह १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

-मास्क आवश्यक, थर्मल स्क्रीनिंग झाले - एका बेंचवर एकच विद्यार्थी, प्रार्थना वर्गातच - शिक्षकांनी टाळ्या वाजवून केले स्वागत नागपूर ...

-मास्क आवश्यक, थर्मल स्क्रीनिंग झाले

- एका बेंचवर एकच विद्यार्थी, प्रार्थना वर्गातच

- शिक्षकांनी टाळ्या वाजवून केले स्वागत

नागपूर : १० महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी महापालिकेच्या हद्दीतील ९ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी प्रशासन व शाळांनी घेतल्याने कुठलाही धोका जाणवला नाही. उलट विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू झाल्याने प्रचंड उत्साह होता आणि कोरोनाची भीती त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात नव्हती. पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला. मात्र शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांमध्येसुद्धा शाळा सुरू झाल्याचा उत्साह १०० टक्के होता.

सोमवारी सकाळी शाळेच्या प्रवेशद्वारावर थर्मल गन, सॅनिटायझर घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बघून विद्यार्थ्यांच्या ह्रदयाचे ठोके वाढले. तपासणीनंतर आपल्याला शाळेत घेतले जाईल ना, असा प्रश्नही काही विद्यार्थ्यांना निश्चितच पडला. थर्मल चाचणी आणि हॅण्ड सॅनिटाईझ केल्यानंतर विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवत वर्गात सोडण्यात आले. वर्गातही एका बेंचवर एक विद्यार्थी अशी व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील ५५९ शाळांमध्ये १४,०९७ विद्यार्थी पहिल्या दिवशी उपस्थित झाले. काही शाळांनी टाळ्या वाजवित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. बऱ्याच कालावधीनंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांनाही शिकविण्याचा मोह आवरला नाही. सलग साडेतीन तास शाळा झाली. काही शाळांमध्ये राष्ट्रगीत वर्गातच घेण्यात आले.

- मनपाच्या शाळेत ३३ टक्के उपस्थिती

सोमवारी नागपूर महापालिकेच्याही शाळा सुरू झाल्या. महापालिकेच्या वर्ग ९ ते १२ च्या २९ शाळा असून ३,८९६ विद्यार्थी आहेत. पहिल्या दिवशी १,२८५ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. ही उपस्थिती जवळपास ३३ टक्के होती. विशेष म्हणजे १,३८४ पालकांनी संमतीपत्र दिले.

- शाळा भेटीचा अहवाल

सुरू झालेल्या शाळा - ५३९

विद्यार्थ्यांची संख्या - १,४१,६२८

उपस्थित विद्यार्थी - १४,०९७

एकूण शिक्षक - ६,१६६

उपस्थित शिक्षक - ५,५४८

पॉझिटिव्ह निघालेले शिक्षक - ६९

---------------

- ६९ शिक्षक पॉझिटिव्ह

प्रशासनाने शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य केले होते. त्यानुसार शहरातील खासगी शाळा व मनपा शाळांच्या शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी केली असता मनपाच्या शाळांचे चार शिक्षक व दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले. तर खासगी शाळांमधील ६३ शिक्षक कोरोनाबाधित आढळले.

- सभापतींनी साधला संवाद

मनपाच्या विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने व शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले. एकमेकांशी हस्तांदोलन टाळणे, पाणी पिण्यासाठी स्वत:च्याच बॉटलचा उपयोग करणे, पूर्णवेळ मास्क लावूनच राहणे अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केल्या.

- पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप

शाळेच्या पहिल्याच दिवशी मनपातर्फे सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांचे गणवेशही लवकरच वितरित केले जातील. लवकरच १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहेत. पुढे १५ जानेवारीपर्यंत शिक्षणविषयक विविध उपक्रमही मनपाद्वारे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती दिलीप दिवे यांनी दिली.

- दिशानिर्देशांचे पालन करा : राधाकृष्णन बी.

शासनाने कोरोनाच्या सुरक्षेसंदर्भात दिलेल्या सर्व उपाययोजना शाळांना करायला लावल्या. पालकांचे संमतिपत्र अनिवार्य केले. कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष न करता कोविडसंदर्भात सर्व दिशानिर्देशांचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

- दहा महिन्यानंतर आज पहिल्यांदा विद्यार्थ्यांना बघून आनंद झाला. राष्ट्रगीत व संविधानाच्या पठणाने शाळा गजबजली. आम्हा शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनाचे समाधान मिळाले.

- भाग्यश्री माधव अणे, मुख्याध्यापिका, सी.पी. अ‍ॅण्ड बेरार हायस्कूल, रविनगर

- ७० टक्के विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी उपस्थिती होती. आम्ही सर्व शाळेत सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या. विद्यार्थीही शाळेत येण्यास उत्सुक दिसले. शिक्षकांनाही विद्यार्थी शाळेत आल्याचे समाधान मिळाले. आम्हाला अपेक्षा आहे या आठवड्यात आम्ही १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील.

बाळा आगलावे, शिक्षक, पंडित नेहरू हायस्कूल, काटोल रोड, मकरधोकडा

- आम्ही पहिल्या दिवशी वर्ग १० व १२ सुरू केला. या दोन्ही वर्गातील २५० विद्यार्थी आज शाळेत आले होते. शिक्षकांपासून शिपायांपर्यंत आम्ही सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट केली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व काळजी आम्ही घेतली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे १० महिन्यापासून शाळेत पसरलेला जो शुकशुकाट होता तिथे आज चिवचिवाट बघायला मिळाला.

राजाभाऊ टांकसाळे, संचालक, सेंटपॉल स्कूल, हुडकेश्वर