शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जीम ट्रेनरचा जीव घेणाऱ्या पोलिसाला वाचविण्याचे प्रयत्न

By admin | Updated: April 27, 2017 22:22 IST

बदनामी आणि पोलीस कारवाईचा धाक दाखवतानाच अनेकांसमोर बेदम मारहाण करून जीम ट्रेनरला आत्महत्या करण्यास प्रवृत्त

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 27 - बदनामी आणि पोलीस कारवाईचा धाक दाखवतानाच अनेकांसमोर बेदम मारहाण करून जीम ट्रेनरला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पोलिसाला वाचविण्याचे प्रयत्न जरीपटका पोलिसांकडून होत आहे. त्यामुळे मृत तरुणाच्या नातेवाईकांसह मार्टिननगरातील नातेवाईकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जेम्स ऊर्फ पॅट्रिक जोसेफ ऊर्फ प्रकाश राधेशाम जखार, (वय ३१) हा तरुण बैरामजी टाऊनमधील तळवलकर जीममध्ये ट्रेनर होता. बाजूलाच राहणाऱ्या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. नंतर त्यांच्यात विसंवाद निर्माण झाला. त्यानंतर या घटनेतील आरोपी बिजिट ऊर्फ सुजी ललित जेम्स (वय २६) पोलीस कर्मचारी आहे, ती आणि तिच्या अन्य एका पोलीस कर्मचारी असलेल्या साथीदाराने संगनमत करून जेम्सला २४ एप्रिलच्या रात्री तसेच २५ एप्रिलच्या सकाळी जीममध्ये जाऊन अनेकांसमोर मारहाण केली. त्याला बदनाम करून पोलीस ठाण्यात डांबण्याची आणि जीवे मारण्याचीही धमकी दिली. जीममधील अनेकांदेखत अपमान झाल्याने जेम्सच्या मनावर विपरीत परिणाम झाला. २५ एप्रिलला तो जीममधून घरी आला आणि त्याने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर एलीझाबेझ राधेश्याम जखार (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी बिजिट ऊर्फ सुजी, ज्योती ललित जेम्स आणि मारहाण करणाऱ्या ह्यत्याह्ण पोलिसाविरुद्ध कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा घडून तीन दिवस झाले मात्र पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नाही. विशेष म्हणजे, आरोपी पोलिसाचे नाव माहीत असूनही पोलिसांनी त्याचे नाव माहिती कक्षाला अद्याप कळविले नाही.  आयुक्तांकडे होणार तक्रार जेम्सने आत्महत्या केल्याचे कळताच आरोपी सुजी आणि ज्योतीने त्याच्या घरातून त्याचा मोबाईल चोरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चोरी आणि पुरावा नष्ट करण्याचे कलमदेखील लावले नाही. आरोपी पोलीस कर्मचारी मोकाट फिरत आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा, याची वाट बघत असल्याचा पोलिसांवर संशय घेण्यात येत आहे. पोलिसांच्या एकूणच भूमिकेवरून या भागातील सामाजिक कार्यकर्ते संतप्तत झाले आहेत. सुस्वभावी जेम्स त्याच्या वृद्ध आईच्या जगण्याचा आधार होता. तो हिरावून घेणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करावी तसेच आरोपीला वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या जरीपटका पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे नागरिक करणार आहेत.