शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षांत समारंभ ‘ग्लोबल’ करण्याचे प्रयत्न

By admin | Updated: September 23, 2014 01:06 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ थाटात पार पाडावा, यासाठी प्रशासनाकडून पूर्ण जोर लावण्यात येत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनादेखील

नागपूर विद्यापीठ : इंटरनेटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ थाटात पार पाडावा, यासाठी प्रशासनाकडून पूर्ण जोर लावण्यात येत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनादेखील ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होता व्हावे यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यासंदर्भात प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याबद्दल निरनिराळे विकल्प तपासण्यात आले असून, हे करणे कितपत शक्य होईल यासंदर्भात सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.या सोहळ्यास तीन हजारांहून अधिक निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. ‘डोम’चा आकार पाहता ठिकठिकाणी ‘एलसीडी स्क्रीन’ लावण्यात येणार आहेत. यासाठी कॅमेऱ्यांची व्यवस्था राहणारच आहे. मग याचाच उपयोग करून इंटरनेटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करणे शक्य आहे, अशी कल्पना अधिकाऱ्यांना सुचली. यासंदर्भात विद्यापीठाकडून निरनिराळ्या ‘एजन्सी’सोबत बोलणी सुरू असून विद्यापीठाचेच काम पाहणाऱ्या ‘प्रोमार्क’ची यासाठी मदत घेण्याची शक्यता आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचा नेमका निर्णय झाला नसला तरी याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. लहान मुलांना ‘नो एन्ट्री’या सोहळ्यादरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासनाने लहान मुलांना कार्यक्रमस्थळी प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमपत्रिकेत या आशयाची ठळक सूचनाच देण्यात आली आहे.या दीक्षांत समारंभात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यासोबतच अनेक ‘व्हीआयपी’ व्यक्ती येणार असल्याने सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळेच कॅमेरा, ब्रीफकेस, हॅन्डबॅग यांच्यासोबतच मोबाईल फोन व आयपॅडला आणू नये, अशा सूचनादेखील विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)