शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये जमीन वाटपावर कल बदलण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST

- दीपक कपूर : सेझबाहेर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला जागा नागपूर : विदर्भातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या मिहान प्रकल्पात जमीन ...

- दीपक कपूर : सेझबाहेर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला जागा

नागपूर : विदर्भातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या मिहान प्रकल्पात जमीन वाटपावर गुंतवणूकदारांचा कल बदलण्याचा प्रयत्न असून कंपनीच्या प्रस्तावानंतर तातडीने जमीन वाटपाचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी व्यक्त केले आहे.

मिहानमध्ये सकारात्मकता परत आणण्यासाठी आणि मिहान प्रकल्प संबंधित असलेली काही नकारात्मक धारणा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अंतर्गत एमएडीसीने विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (सेझ) मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व नर्सिंग होमसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जाहिरात जाहीर केल्यापासून केवळ सहा आठवड्यात वाटपपत्र दिले. या जागेकरिता सहा निविदा आल्या होत्या. तांत्रिक फेरीनंतर सर्व सहा निविदाकार पात्र ठरले. निविदा उघडल्यानंतर नरेंद्र जिचकार यांच्या सर्वाधिक बोली लावणाऱ्या अंजनी लॉजिस्टिकला जमीन वाटपपत्र देण्यात आले. त्यांना ०.३० एकर जागा देण्यात आली. या जागेसाठी १.१० कोटींचा महसूल मिळाला.

आयटी कंपन्यांचे जागेचे वितरण

काही महिन्यात एमएडीसीने आयटी क्षेत्रातील पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीस, विमानसेवा क्षेत्रातील कल्पना सरोज एव्हिएशन आणि आता आरोग्य क्षेत्रातील अंजनी लॉजिस्टिकला जमीन दिली आहे. मिहानमध्ये आधीच १५० एकरात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (एम्स) कार्यरत आहे. मिहानमधील सेझच्या बाहेरील भागात फर्स्ट सिटी, महिंद्रा ब्लूमडेल, मोराज वॉटरफॉल या मोठ्या टाऊनशिप आहेत. अंजनी लॉजिस्टिकला दिलेली जमीन या भागातील आरोग्य सुविधांची गरज पूर्ण करेल. आरोग्य क्षेत्रामध्ये करिअर शोधणाऱ्या शेकडो तरुणांसाठी रोजगार निर्मितीदेखील करेल, अशी अपेक्षा दीपक कपूर यांनी व्यक्त केली.