शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दलित-बहुजनांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा संघाचा प्रयत्न

By admin | Updated: October 14, 2015 03:27 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असून शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होत आहे.

शिक्षणप्रणालीत बाबासाहेबांच्या विचारांचा आग्रह : सामाजिक समरसतेकडे पाऊलयोगेश पांडे नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असून शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होत आहे. परंतु ही प्रतिमा दूर होऊन दलित-बहुजनांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी संघाचे पदाधिकारी आग्रही असून त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. संघ परिवारातील अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान याचेच प्रतिबिंब दिसून आले. शिक्षणप्रणालीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण होऊन त्यांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आला.देशात सत्तांतर झाल्यापासून संघाकडून सर्वात जास्त भर हा शिक्षणप्रणालीतील बदल व सामाजिक समरसता यांच्यावर देण्यात येत आहे. मार्चमध्ये नागपुरात झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सामाजिक समरसतेचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील वारंवार ‘एक गाव, एक पाणवठा’ तसेच सर्वांसाठी गावांमधील मंदिरे खुली व्हावीत यासारख्या बाबींना समर्थन दिले. संघ स्वयंसेवकांना सामाजिक समरसतेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यास सांगण्यात आले व त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नदेखील सुरू होते.परंतु आरक्षणाचा फेरविचार व्हावा, या डॉ.भागवतांनी दिलेल्या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ माजली व संघ दलित-बहुजनविरोधी असल्याचा जोरदार प्रचार होऊ लागला. या वक्तव्यामुळे दलित-बहुजनांमध्ये निर्माण होत असलेल्या विश्वासाला तडा गेला असून तो परत मिळविणे संघासमोर आव्हान ठरणार आहे.अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघातर्फे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात ९ ते ११ आॅक्टोबरदरम्यान आयोजित अधिवेशनादरम्यान देशातील ‘केजी’पासून ते ‘पीजी’पर्यंतच्या शिक्षण प्रणालीत कोणते बदल हवेत यावर मंथन झाले. समाजातील सर्व घटकांपर्यंत भेदभाव दूर सारून समान शिक्षण कसे पोहोचेल या मुद्यावर यात सर्वात अधिक भर दिसून आला. एकात्ममानववाद निर्माण करणारी शिक्षणप्रणाली निर्माण करणे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे शिक्षणप्रणालीत अनुसरण करणे हे दोन महत्त्वाचे प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आले. संघाचे काही पदाधिकारी अन् स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करणारडॉ.आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार, त्यांची आवश्यकता, त्यांच्या विचारांतील दृष्टिकोन यांचा शिक्षणाच्या माध्यमातून यांचा जास्तीत जास्त प्रसार कसा होईल यावर सखोल मंथन झाले. सर्वांना समान संधी, वंचितांचा विकास याबाबत बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श शिक्षणप्रणालीत अंतर्भूत असावा असाच सूर दिसून आल्याची माहिती महासंघाचे महामंत्री जगदीश प्रसाद सिंघल यांनी दिली.