शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला पर्यटन जिल्हा करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 3, 2015 02:42 IST

नागपूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा व्हावा, या दृष्टिकोनातून पर्यावरण विकासाबाबत वेगळे धोरण अवलंबावे. जिल्ह्यातील तलाव, धरणे व अभयारण्य यांना जागतिक स्तरावर..

जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर : नागपूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा व्हावा, या दृष्टिकोनातून पर्यावरण विकासाबाबत वेगळे धोरण अवलंबावे. जिल्ह्यातील तलाव, धरणे व अभयारण्य यांना जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त करून देणे व पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. पर्यटनाच्या माध्यामातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी जलसंपदा विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत एका बैठकीत चर्चा केली. महाराष्ट्र सिंचन सुधारणा विशेष कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित ३०५ कोटी किमतीचे लायनिंगच्या सात कामांना विस्तार व सुधारानुसार प्रस्तव पाठविण्याचे निर्देश मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. पेंच प्रकल्पाच्या दुसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त उजवा व डवा कालव्यावरील शाखा कालवे व वितरिकांचे अस्तरीकरणाच्या २९६ कोटी रुपयांच्या ११ कामांना तांत्रिक मान्यता व निविदांसाठी तीन महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. पेंच प्रकल्पाचे मुख्य कालवे मागील दहा वर्षात ४५ वेळा फुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे मोठी हानी टाळण्यासाठी माती कामाकरिता ४२ कोटी रुपयांचा निधी जलसंपदा विभागाकडून देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पेंच प्रकल्पातून दरवर्षी २५ ते ३० कोटी रुपये पाणी पट्टी निधी शासनास मिळतो. प्रकल्पाचे देखभाल दुरुस्तीसाठी वार्षिक ३ ते ४ केटी रुपये मिळतात. हा निधी १० ते १५ कोटी रुपयापर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. सिंचन व्यवस्थापनाकरिता नागपूर जिल्ह्यात तीन विभागांतर्गत फक्त १७९ कर्मचारी आहेत. आकृतीबंधानुसार ६१६ क्षेत्रीय कर्मचारी पदे मंजूर आहेत. रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने घेता येणे शक्य आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्र्यांनी बैठकीत दिले.(प्रतिनिधी)