लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका आरोपीने घरात शिरून पाशवी अत्याचार केल्यामुळे क्षुब्ध झालेल्या पीडित महिलेने स्वत:च्या हाताची नस कापून आणि झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री ७.३० ते ८ च्या सुमारास कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.पीडित महिला ४२ वर्षांची आहे. ती तिच्या घरात एकटीच राहते. बाजूला शिवकृष्ण झोपडपट्टीत राहणारा दिनेश चुन्नीलाल शाहू (वय ३२) याची तिच्यावर अनेक दिवसांपासून वाईट नजर होती. शुक्रवारी रात्री ७.३० ते ८ च्या सुमारास ती घरात पुस्तक वाचत असताना अचानक आरोपी दिनेश तिच्या घरात शिरला. त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर तिला धमकी देत त्याने नेहमीसाठी अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले. तू ऐकले नाही तर तुझी गावभर बदनामी करेन, अशी धमकीही दिली. पती नसल्यामुळे एकाकी जीवन जगणाऱ्या या असहाय महिलेला आरोपी दिनेशकडून नेहमीसाठी लैंगिक छळ केला जाण्याची कल्पना आल्याने तिने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापून घेतली. एवढेच नव्हे तर नंतर झोपेच्या ८ ते ९ गोळ्या खाल्ल्या. तत्पूर्वी तिने नियंत्रण कक्षात अत्याचाराची तसेच आरोपीची माहिती दिली. नियंत्रण कक्षातून कोराडी पोलिसांना कळविण्यात आले. लगेच कोराडीचा पोलीस ताफा महिलेच्या घरी पोहचला. यावेळी आरोपी दिनेश शाहू पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला पकडले. महिलेला मेयोत दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या बयानावरून कोराडी पोलिसांनी आरोपी शाहूला बलात्कार करून आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपात अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात बलात्कारित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:29 IST
एका आरोपीने घरात शिरून पाशवी अत्याचार केल्यामुळे क्षुब्ध झालेल्या पीडित महिलेने स्वत:च्या हाताची नस कापून आणि झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री ७.३० ते ८ च्या सुमारास कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.
नागपुरात बलात्कारित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
ठळक मुद्देहाताची नस कापून झोपेच्या गोळ्या खाल्ल्या : कोराडीत गुन्हा दाखल, आरोपी गजाआड