लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मद्यधुंद आॅटोचालकाने एका तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेथील काही व्यसनी व्यक्तींनी आॅटोवाल्यांना त्यासाठी मदत केली. मात्र, आजूबाजूची मंडळी धावून आल्याने तरुणीची अब्रू बचावली. आज रात्री १० च्या सुमारास कस्तूरचंद पार्कजवळ ही खळबळजनक घटना घडली.सूत्रांच्या माहितीनुसार, निराधार किंवा बाहेरगावाहून आलेल्या महिला, मुलींना एकटे पाहून काही वाहनचालक, विशेषत: आॅटोचालक त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून अंधाऱ्या ठिकाणी नेतात अन् त्यांच्यावर बलात्कार करतात. यापूर्वी शहरात अशा अनेक घटना उघडकीसही आल्या आहेत. आज रात्री असाच एका आॅटोचालक आणि त्याच्या साथीदाराने प्रयत्न केला. कस्तूरचंद पार्कच्या अंधाºया भागात नेऊन ते कुकर्म करण्याच्या तयारीत असताना तेथे आजूबाजूची मंडळी धडकली. त्यांनी आरोपींना हटकले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तरुणीलाही हिंमत आली. त्यामुळे तिने मदत करणारांना आपली कैफियत ऐकवली. परिणामी तिच्या मदतीला अनेक जण धावले. आरोपींनी त्यांच्याशी वाद घातल्याने मोठा तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सदर पोलीस पोहचले. त्यांनी सर्वांना सदर ठाण्यात नेले. तेथे वृत्त लिहिस्तोवर पीडित तरुणी आणि आरोपी तसेच मदत करणारे या सर्वांना विचारपूस केली जात होती.
नागपुरात मद्यधुंद आॅटोचालकाचा तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 01:02 IST
मद्यधुंद आॅटोचालकाने एका तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेथील काही व्यसनी व्यक्तींनी आॅटोवाल्यांना त्यासाठी मदत केली. मात्र, आजूबाजूची मंडळी धावून आल्याने तरुणीची अब्रू बचावली. आज रात्री १० च्या सुमारास कस्तूरचंद पार्कजवळ ही खळबळजनक घटना घडली.
नागपुरात मद्यधुंद आॅटोचालकाचा तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न
ठळक मुद्देनागरिक धावल्याने वाचली अब्रू : कस्तूरचंद पार्कमध्ये तणाव