शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मोबाईलवरून आईला कळवल्याने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 15:09 IST

घरात एकटी मुलगी असल्याचे पाहून हुडकेश्वरमधील एका वस्तीतील आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने मोबाईलवरून आईला कळवताच ती घरी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देलाथा मारून दार तोडण्याचा प्रयत्नहुडकेश्वरमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरात एकटी मुलगी असल्याचे पाहून हुडकेश्वरमधील एका वस्तीतील आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने मोबाईलवरून आईला कळवताच ती घरी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आरोपीने मुलीला आणि तिच्या आईला अश्लिल शिवीगाळ केली. तर, मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ११.३० ते दुपारी १. २० दरम्यान ही घटना घडली.अतूल सूर्यवंशी (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो जेथे राहतो. त्याच वस्तीत पीडित परिवारातील सदस्य राहतात. मुलगी (वय १७) अकरावीला शिकते. कॉलेज आणि ट्यूशनला जातेवेळी तिचा आरोपी अतुल नेहमी पाठलाग करायचा. तिच्याशी तो सलगी साधण्याचा प्रयत्न करत होता. या मुलीने काही दिवसांपूर्वी ही बाब आपल्या आईवडीलांना सांगितली. त्यावरून मुलीच्या आईने त्याच्या घरी जाऊन त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी ११.३० मुलीचे आईवडील कामावर गेले होते. ती घरात एकटीच असल्याचे पाहून आरोपी तिच्या घराकडे आला. ते पाहून मुलीने आपले दार लावून घेतले. आरोपीने दार उघडावे म्हणून मुलीला दमदाटी केली. तिने दार उघडले नाही म्हणून अश्लिल शिवीगाळ केली. मुलीने आपल्या आईला मोबाईलवर संपर्क करून हे सर्व सांगितले. लगेच मुलीची आई घरी पोहचली. त्यांना पाहून आरोपी पळू लागला. मुलीच्या आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करून मुलीला आणि तुझ्या पतीला ठार मारेन, अशी धमकी दिली. महिलेने हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी अतुल सूर्यवंशीचा शोध घेतला जात आहे.आरोपी दारूड्या, उपद्रवीआरोपी अतुल सूर्यवंशी हा उपद्रवी म्हणूनच परिसरात कुख्यात आहे. तो दारूड्या आहे. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास आहे. त्याने बुधवारी भरदिवसा केलेल्या या संतापजनक प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, त्याला तातडीने अटक करावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

 

 

टॅग्स :Rapeबलात्कार