शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांनी नराधमाची काढली नग्न धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:41 IST

घरात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. वेळीच चिमुकलीची आई तेथे धडकल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देपारडीत प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. वेळीच चिमुकलीची आई तेथे धडकल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच शेजाऱ्यांनी एकत्र येऊन नराधमाला बेदम मारहाण केली. त्याला बदडतच संतप्त जमावाने पारडी पोलीस ठाण्यात नेले. रविवारी सायंकाळी ४. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.पीडित बालिका पुनापूर पारडीत राहते. ती आज आपल्या घराच्या दारासमोर खेळत होती. बाजूलाच तिची आई कामात गुंतली होती. याच परिसरात राहणारा आरोपी जवाहर बाबूराव वैद्य (वय ४०) तेथे आला. त्याला बालिका एकटीच दिसल्याने त्याने तिला घरात नेले आणि कपडे काढून तो तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करीत असतानाच बालिकेची आई तेथे धडकली. तिने नको त्या अवस्थेत नराधमाला बघून आरडाओरड केली. त्यामुळे आरोपी पळू लागला. महिलेने मुलीच्या वडिलांना सांगितले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. पीडित बालिकेच्या आईने शेजाऱ्यांना झालेली घटना सांगितली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने नराधम जवाहर वैद्यला पकडून त्याची बेदम धुलाई केली. त्याचे कपडे फाडले व त्याला तशाच अवस्थेत पोलिस ठाण्यावर नेले.. तेथे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी जमावाचा रोष उफाळून आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे पोहचले. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. पारडी पोलिसांनी आरोपी जवाहर वैद्य याला पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली.प्रकरणाला राजकीय रंग !आरोपी जवाहर वैद्य हा त्या भागातील नगरसेवकाचा नातेवाईक आहे. त्यामुळे या प्रकरणाला काही जणांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. तर, काही जणांनी आरोपी मनोरुग्ण असल्याचा युक्तिवाद करून हे प्रकरण शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र, हैदराबादमधील बलात्कार आणि हत्याकांडाच्या प्रकरणाने देशभर वातावरण संतप्त केले असताना घडलेल्या या घटनेमुळे तसेच पीडित मुलगी केवळ चार वर्षांची असल्याने या प्रकरणाने पारडीत रात्रीपर्यंत प्रचंड तणावाचे वातावरण होते.

 

 

 

टॅग्स :Molestationविनयभंग