शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत जात असलेल्या विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न

By admin | Updated: June 15, 2017 02:08 IST

कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध प्रियकरासोबत जात असलेल्या कायद्याच्या विद्यार्थिनीचे दिवसाढवळ्या अपहरण

काँग्रेसनगरात दिवसाढवळ्या घडली घटना : धंतोलीत गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध प्रियकरासोबत जात असलेल्या कायद्याच्या विद्यार्थिनीचे दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता काँग्रेसनगर येथे घडली. १९ वर्षीय मुलगी कायद्याची विद्यार्थिनी आहे. ती एका तरुणासोबत प्रेम करते. त्याच्याशी लग्न करायची तिची इच्छा आहे. परंतु तिचा घरच्यांना याला विरोध आहे. दस्तावेज नसल्याने ती घरच्यांना सोडून प्रियकरासोबत राहू लागली. विद्यार्थिनीने आपल्या प्रियकरासोबत ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घतली. त्यांना घटनेची माहिती दिली. विद्यार्थिनीने प्रियकराच्या अजनी येतील मामाच्या घरी राहण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रामीण पोलिसांनी तिला अजनी पोलिसांना सूचना करण्याचा सल्ला दिला. यानंतर मंगळवारी सकाळी ती प्रियकरासोबत अजनी ठाण्यात आली. तिने अजनी पोलिसांनाही लग्न करण्याबाबत सांगितले. पोलिसांनी तिला ती १८ वर्षे पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मागितले. तिला शपथपत्र बनवून आणण्याचा सल्ला दिला. अजनी पोलिसांनी सांगितल्यानुसार विद्यार्थिनी शपथपत्र बनविण्यासाठी गेली. यादरम्यान तिच्या कुटुंबीयांना पोलिसांनी माहिती दिली. शपथपत्र बनविल्यानंतर ती टॅक्सीने रामेश्वरीकडे जात होती. दरम्यान न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेसनगर येथे तीन लोकांनी तिची टॅक्सी थांबविली. दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यातील एका व्यक्तीने मी तुझ्या भावासारखा आहे, तुझी आई मरण पावली, असे सांगत तिला सोबत नेण्याचा प्रयत्न केला. यावरून तिचे भांडण झाले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच विद्यार्थिनी, तिचा प्रियकर व त्याच्या बहिणीने टॅक्सीचालकाला लगेच धंतोली पोलीस ठाण्यात चलण्यास सांगितले. यादरम्यान विद्यार्थिनीचे कुटुंबीयसुद्धा ठाण्यात पोहोचले. दोन्ही बाजूचे लोक ठाण्यात आल्याने वाद वाढला. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.