शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वीजवसुली पथकावर हल्ला, कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीजवसुली करण्यासाठी गेलेल्या पथकावर ग्राहकाने हल्ला केला. लोखंडी रॉडने वार करून कर्मचाऱ्यास रक्तबंबाळ केले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीजवसुली करण्यासाठी गेलेल्या पथकावर ग्राहकाने हल्ला केला. लोखंडी रॉडने वार करून कर्मचाऱ्यास रक्तबंबाळ केले. ही घटना रविवारी दुपारी इंद्रप्रस्थनगर येथे घडली. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली.

क्रिष्णा अरुण वाट या अमर आशा ले-आउट इंद्रप्रस्थनगर येथे राहतात. त्यांच्या नावावर वीज मीटर आहे. त्यांच्यावर ५ हजार रुपयांची वीज थकबाकी होती. रविवारी सकाळी महावितरणच्या यशोधानगर जयताळा या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पथक वसुलीसाठी वाट यांच्याकडे गेले. या पथकात तंत्रज्ञ विकास राऊत, अनिल फुलझेले, सुखदेव केराम, आशिष अलकरी आणि गजाजन मोरे (वाहक) यांचा समावेश होता. तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांना थकबाकी भरण्याची पुन्हा विनंती केली. तेव्हा क्रिष्णा यांनी वाद घातला. तुम्हाला माझेच घर दिसते का, मी तुमच्या अधिकाऱ्यांशी बोलते, दाखवा तुमची लिस्ट, असे म्हणत वीजबिल हिसकावून घेतले. या सर्व प्रकाराचे मोबाइलवर व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या फुलझेले यांना शिवीगाळ करीत दोन थापडा मारल्या. याबाबत केराम यांनी जाब विचारला असता, त्यांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांचा मुलगा अनिरुद्ध याने लाेखंडी रॉडने डोक्यावर वार केले. त्यांचा दुसरा मुलगा इशांत यानेही हातबुक्कीने मारहाण केली. केराम यांच्या डोक्यावर वार झाल्याने ते रक्तबंबाळ झाले. विकास राऊत यांनी सोनेगाव पोलिसात तक्रार केली.

- वीज कर्मचारी-अधिकारी संघटनेने केला घटनेचा निषेध, आज द्वारसभा

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सघंटनेचे नागपूर झोनल उपाध्यक्ष सहायक-अभिंयता श्रीरंग मुत्तेपवार व विभागीय सचिव सुजित पाठक, तसेच इतर पदाधिकारी यांना घटनेची माहिती होताच, ते लगेच घटनास्थळी गेले. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी १.३० वाजता विद्युत भवनासमोर द्वारसभा आयोजित करण्यात आली आहे. वसुली पथकाला संरक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

.